कम्फर्ट झोन

कोण म्हणालं, ‘तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याची गरज आहे?’
(Darius Foroux या लेखकाच्या Do it today या प्रसिद्ध पुस्तकातील एका प्रकरणाचा सारांश)

 

 

मला माझा कम्फर्ट झोन आवडतो, कारण माझ्यासाठी खरी जादू इथेच घडते. माझ्या कम्फर्ट झोनमध्ये माझं कुटुंब, मित्र, काम, संगीत, पुस्तकं, सिनेमा, जिम, बाईक, पार्क अशा गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींवर माझं प्रेम आहे आणि त्या सुरक्षित जागेमध्ये मला नवीन गोष्टीसाठी प्रयत्न करायला आणि धोके पत्करायला आवडतात.

 

जर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्यानंतरच जादू आणि यश दिसणार असेल, तर ते खूप हास्यास्पद आहे. आपण त्याच्याच आत असताना, आपला कम्फर्ट झोन हा वाईट आहे असं कशाला दाखवायचं?

 

अनेक प्रसिद्ध सेल्फ हेल्प गुरू सांगतात की, कम्फर्ट झोन ही वाईट गोष्ट आहे, पण मी असं मानत नाही. ते लोक एक लहानसं केविलवाणे वर्तुळ दाखवतात आणि त्याच्या बाहेर मोठं वर्तुळ दाखवतात. याबद्दल तुम्ही मला निराशावादी म्हणा, स्टोईक म्हणा, पण काहीही म्हणा, तरीही मी मात्र व्यवहारी माणूस आहे हे मात्र खरं. आणि व्यवहारिकदृष्ट्या बघायला गेलं तर, खरोखर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या फार बाहेर जाऊ शकत नाहीत. खरेतर मी यश आणि जादूकडे नेणाऱ्या स्थिर; पण शांतपणे जाणाऱ्या मार्गावर विश्वास ठेवतो. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. माझं असं म्हणणं नाही की, मी कायम एकाच जागेवर खिळून बसलेला असतो. एका जागी खिळून राहणं ही खरंतर माझ्यासाठी मृत्यूदंडासारखी शिक्षा आहे.

 

आयुष्याचे अनेक टप्पे असतात, असं मी मानतो. काही वेळा तुम्ही निवांत असता, काही वेळा तुम्ही तुमच्या कौशल्यांवर काम करता, काही वेळा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वावर काम करता, अशा वेळी तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये गुंतवणूक करता. जर तुम्ही तुमच्या स्वतःवर काम केले नाही आणि तुमच्यात आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही कधीही धोका पत्करू शकणार नाही. आता मी जे करतोय, ते मला फार वर्षांपूर्वीच करायचं होतं. पण उडी मारून कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्याऐवजी मी हळूहळू मोठ्या गोष्टी आणि आव्हानं स्वीकारत गेलो.

 

त्यामुळेच जे लोक तुम्हाला सांगतात, की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायलाच हवं! हे माझ्यासाठी खूप वाईट आहे. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या कधी बाहेर पडलात आहात का? थोड्या वेळासाठी का होईना, पडलात आहात का? पडलात असाल, तर तुम्हाला तिथं काय दिसलं?हातात पैसे घेऊन उभा असलेला हुजऱ्या? मला असं वाटतं, तुम्ही जर तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलात, तर तुमच्यासाठी फक्त कामच वाट बघत असतं. हे काही फार आकर्षक नाही, त्यात काही फार जादू वगैरे नाही. तिथे फक्त घाम गाळा, रक्त अथवा आणि अश्रू ढाळा इतकंच आहे.

 

कम्फर्ट झोन ही खरं म्हणजे एक दंतकथा आहे. अशा प्रकारचे कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्याचे लेख जे लोक वाचतात, त्यांना आयुष्यात काहीतरी अचाट आणि अशक्य साध्य करायचं असतं, असं मला वाटतं आणि हे सोपं नाहीये हे तुम्हाला माहित आहेच. म्हणूनच, मग तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडून त्याच्यातून बाहेर येऊन मुळातच अवघड असलेल्या गोष्टी अजून अवघड का करता? उलट त्याऐवजी आपण लहान गोष्टीतून सुरुवात करा, पाया भक्कम करा आणि भीती वाटण्याच्या अगोदरच तिथे आरामदायी वातावरण तयार करा.

 

पाया भक्कम करा म्हणजे काय? तुम्हाला जर तणावविरहित आयुष्य जगायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये काही पैसे जमा करून ठेवावे लागतील. ज्यामुळे तुम्हाला अपयश आलं, तरी किमान सहा महिने तरी अन्नपाणी मिळू शकाल. अपयश मिळालं, तर ही एक सुरक्षित पद्धत आहे. अर्थात, हे माझं व्यावहारिक मन मला सांगतं. बाकी गणित काय आणि ते आकडे तुमच्यासाठी किती असेल हे ठरवा आणि तेवढी रकम तुमच्या खात्यामध्ये असल्याशिवाय हा धोका पत्करण्याचा विचारही करू नका.

 

आणखी एक भक्कम पाया म्हणजे, काही चांगली कौशल्यं शिकून घ्या. मी पैशांची जास्त काळजी करत नाही याचं एक कारण असंही आहे, की कोणतंही काम शोधायची आणि ते करायची माझ्यात पात्रता आहे. जर उद्याच माझी सगळी कामं नाहीशी झाली, तर परवा मला काहीतरी काम मिळेल, याची मला खात्री आहे. मी माझ्या स्वतःच्या शिक्षणामध्ये लाखो रुपये आणि अनेक वर्षं गुंतवलेली आहेत. तर प्रश्न असा आहे : तुमच्याकडे कोणती कौशल्यं आहेत? तुम्ही जगामध्ये कोणती चांगली गोष्ट निर्माण करू शकता? तुम्ही कोणत्या समस्या सोडवू शकता?

 

आणखी काही गोष्टी, ज्या तुमचा पाया भक्कम करतील त्या अशा:

 

१. कुटुंब : तुम्हाला जर कुटुंब नसेल, तर एखादं कुटुंब निर्माण करा.
२. मित्र : थोड्या पण चांगल्या लोकांशी मैत्री करा.
३. तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या शरीराची आणि मनाची प्रयत्नपूर्वक काळजी घ्या.

शेवटची गोष्ट म्हणजे, तुम्ही जे कोणी नाही आहात ते व्हायचा प्रयत्न करू नका. तुम्ही अंतर्मुख असाल, तर तुम्ही गोंगाटामध्ये काम करू शकता असं दाखवू नका आणि जर तुम्ही बहिर्मुख असाल, तर तुम्ही एकांतात काम करू शकता असं दाखवू नका. म्हणजे तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहा. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याच्या नावाखाली खाली, तुमचं स्वतःचं आयुष्य विदीर्ण करू नका.

 

बोध

शेवटी, प्रत्येकालाच कम्फर्ट हवा असतो. ही प्रत्येक माणसाची एक मूलभूत गरज आहे. आपल्याला विकासही साधायचा असतो. तर मग तुम्ही जे काही कराल, ते फार काळ तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहू देऊ नका. प्रत्येक दिवशी थोडशी प्रगती करायचा प्रयत्न करा. ते लहानसं पाऊल उचललं तरी चालेल, त्यात काही जादू नाही. थोडेसे प्रयत्न हे पुरेसे आहेत.

 

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

लेखक – अज्ञात

 

error: Content is protected !!