वाचायला आयुष्य पुरणार नाही इतक्या पुस्तकांची साठवण.
होय. ही निरपराध असण्याची कबुली आहेः ही माझी सुंदरशी व्यथा आहे.
माझ्याच्याने वाचून होणार नाहीत हे माहीत असूनसुद्धआ मी पुस्तकं विकत घेत राहतो. आणि मला वाटतंय तुम्हीही तसेच आहात.
लक्षात घ्या, पुस्तक वाचणं म्हणजे पुस्तकाच्या लेखकाशी चर्चा करण्यासारखं आहे. आणि रचनात्मक चर्चा झाली तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. त्या पुस्तकातून फक्त एखादी नावीन्यपूर्ण कल्पना मिळायला हवी. मग ती तुमच्या जगात क्रांती घडवून आणते, नाही का?
आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य पुस्तक मिळालं तर त्या लेखकानं तुमच्यावर मोहिनी घातलीच म्हणून समजा.
आणि वाचून झाल्यावर शेवटी जो हात पुस्तक खाली ठेवतो तो पूर्णपणे बदललेला हात असतो.
माझ्या वाढत्या वयात माझ्या वडिलांनी मला सांगितलं, “तुझा बाकीचा खर्च कमी कर. जेवायला पुरेसं नाही मिळालं तरी चालेल. पण पुस्तकं वाचत राहा.”
मी एकदा मध्य पूर्वेत नेतृत्वगुणांवर कार्यशाळा घेतली होती. एक वरिष्ठ नेता त्यात सहभागी झाला होता. तो नंतर मला म्हणाला, “रॉबिन, सुदृढ होण्यासाठी आपण दिवसातून तीनदा जेवतो. मी विद्वान होण्यासाठी दिवसातून तीनदा वाचतो. ” मी विचारलं, “तुम्ही कधी वाचता?” त्यावर तो म्हणाला, “मी कधी वाचत नाही ते विचार?”
रोज वाचन केल्यानं आपलं ज्ञान वाढत जातं. त्यामुळे कठीण परिस्थितीतून मार्ग शोधायला मदत होते. आपल्या हातून चुका होण्याचं प्रमाण घटतं. पुढे काय होईल याचा अंदाज करता येतो.
यांनी सांगितलंय, “इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही तर कवितेतील कडव्यांमध्ये जसे शब्द जुळलेले असतात तसे इतिहासातले प्रसंग एकामागोमाग एक जुळल्यासारखे येतात.”) तुम्ही चारचौघांसारखं वागावं, बोलावं, विचार करावा अशी तुमच्याकडून अपेक्षा करणाऱ्या या जगात पुस्तकं तुम्हाला स्वतंत्रपणे विचार करायला लावतात. थोर विचारवंतांनी मांडलेल्या कल्पना तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव करून देतील. तुमच्या आत खोलवर लपून बसलेल्या कुतूहलाला जागं करा.
कारण खूप वाचन करणारे लोक यशस्वी होतात.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
