चांगले विचार आणि शुद्ध मन

‼️चांगले विचार आणि शुद्ध मन हेच ईश्वराशी जोडणारा खरा मार्ग आहे.‼️

 

 

🍁एकदा एक लहान मुलगा आपल्या आजोबांबरोबर मंदिरात गेला. देवाचं दर्शन घेऊन दोघं परत येत होते, तेव्हा मुलगा विचारतो.

 

🍁”आजोबा, देव आपल्याला सतत पाहत असतो असं तुम्ही म्हणता… पण त्याला सगळं कसं दिसतं? आपण काही चांगलं किंवा वाईट केलं, ते त्याला कसं कळतं?”

 

🍁आजोबा हसले आणि त्याला जवळच्या तलावाजवळ नेलं. पाणी शांत होतं.ते म्हणाले, “बघ, या पाण्यात तू स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकतोस का?”मुलगा म्हणाला, “हो! अगदी स्पष्ट दिसतं!”आजोबांनी मग त्या पाण्यात एक दगड टाकला. पाण्यावर लाटा उठल्या, आणि प्रतिबिंब दिसेनासं झालं.

 

🍁आजोबा म्हणाले,
“आपलं मनसुद्धा असंच आहे — जेव्हा ते शांत आणि स्वच्छ असतं, तेव्हा त्यात ईश्वर स्पष्ट दिसतो, आपल्याला मार्गदर्शन करतो. पण जेव्हा मनात वाईट विचार, द्वेष, राग, लालसा असते — तेव्हा ईश्वराचं प्रतिबिंब दिसेनासं होतं.”

 

🍁मुलगा गोंधळून म्हणाला, “मग काय करावं?”
आजोबा हसून म्हणाले,”नेहमी चांगले विचार ठेव, सत्य बोल, दुसऱ्याला मदत कर. असं केलंस की तुझं मन स्वच्छ आरशासारखं राहील – आणि ईश्वर तुझ्याशी नेहमी असेच संवाद साधत राहील

 

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!