तुमच्या क्षमतांचा आदर करा

एक खूप साधी सोपी कल्पना आहे; पण तिच्याकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही. ती म्हणजे स्वतःचं कौतुक करायचं. तुम्ही आयुष्यात जे कष्ट घेतलेले आहेत, जे काही मिळवलेलं आहे त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. वेगवगेळ्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात भीती होती. त्या भीतीशी सामना करून तिच्यापासून मुक्ती मिळवलीत, त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. तुम्ही स्वप्नं फक्त पाहिलीच नाहीत तर ती प्रत्यक्षात आणून दाखवलीत, त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. तुम्ही कितीतरी लोकांना आजवर मदत केलीत, त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. तुम्ही आजपर्यंत जी सत्कर्मे केलीत, त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. त्यामुळे, तू अमुक असायला पाहिजेस, तमुक करायला पाहिजेस असं जे तुम्हाला लोक सांगतात त्यावरून स्वतःचं मूल्यमापन करू नका.

तुम्ही आता इथे माझ्याबरोबर आहात हा काही निव्वळ योगायोग नाही. तुमच्या आजूबाजूचे प्रतिष्ठित लोक आंधळेपणानं त्यांचा बहुमूल्य वेळ एका वेगळ्याच दुनियेत घालवत असताना तुम्ही काहीतरी वेगळं शोधत आहात. मला जाणवतंय, तुमच्या आयुष्यात कठीण प्रसंग येऊन गेले तरीही तुम्ही निराश झाला नाहीत. आपलं भविष्य उज्ज्वल असेल असा सकारात्मक विचार तुम्ही करता. तुम्ही आयुष्यभर जी नीतिमूल्ये जपलीत आणि त्यांच्याबद्दल जी स्वप्नं बाळगलीत ती सत्यात आणण्यासाठी तुमच्या आतला आवाज तुम्हाला बोलावतोय. त्या आवाजावर तुमचा दृढविश्वास आहे.

 

                                                                                                                                                     आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात 

error: Content is protected !!