तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत असतो.

 

हार्वर्ड विद्यापीठातील एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की एखादया व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा नोकरी मिळण्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनाचा वाटा ८५% असतो, तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्याचे व्यक्तिमत्त्व यांचा वाटा केवळ १५% असतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या शिक्षणावर खर्च केली जाणारी संपूर्ण रक्कम ही केवळ माहिती आणि आकडेवारी शिकवण्यासाठीच खर्च केली जाते. प्रत्यक्ष नोकरी मिळण्यासाठी ही माहिती फक्त १५% च उपयुक्त ठरत असली तरी !

आपण जी चर्चा करणार आहोत, ती या उरलेल्या ८५% यशाबद्दलच आहे. इंग्रजी भाषेत Attitude (दृष्टिकोन) हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असो की व्यावसायिक दृष्टिकोनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कुणीही अधिकारी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला अधिकारी बनू शकेल का? कोणीही विद्यार्थी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला विद्यार्थी म्हणवून घेण्यास पात्र ठरेल का? आईवडील, शिक्षक, विक्रेता, मालक आणि नोकर यांपैकी कोणीही योग्य दृष्टिकोनाशिवाय आपापले काम योग्य प्रकारे करू शकेल का? अर्थातच नाही!

आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपल्या यशाचा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन.

यश आणि निश्चित ध्येयप्राप्तीसाठी दृष्टिकोनाचे एवढे महत्त्व असेल तर साहजिकच आपला जीवनविषयक दृष्टिकोन आपण तपासून बघायला हवा. ध्येयप्राप्तीमध्ये आपल्या दृष्टिकोनाचा काय प्रभाव पडतो याची चिकित्सा करायला हवी.

 

                                                                                                                                            आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात 

error: Content is protected !!