तुम्हाला त्रास देणारी माणसं एक प्रकारे तुम्हाला मदतच करीत असतात

मी आता फार्म हाऊसवर आहे. एका साध्या खोलीत बसून तुमच्यासाठी हा संदेश लिहितोय. हिवाळा नुकताच संपलाय. खिडकी उघडी आहे. वाऱ्याची झुळूक आत येत आहे आणि ती खोलीभर पसरत आहे. लांब कुठेतरी धनगराच्या कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येतंय. इथल्या शांततेत कोंबड्याचं ओरडणं कर्कश वाटतंय. ऑलिव्हची झाडं लक्ष वेधून घेत आहेत. सकाळच्या सूर्याची किरणं दूरवरचं वाईन यार्ड उजळून टाकत आहे.

असो. चला आपण आता तुम्हाला दुखावणाऱ्या माणसांबद्दल बोलू या. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं, तुमचा वापर करून घेतला, तुमच्याशी लबाडीनं वागले, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांच्यामुळे कदाचित तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणे बंद केले आहे. तुम्हाला लोकांच्या फक्त चुकाच दिसायला लागल्या. तुम्ही लोकांशी बोलेनासे झालात.

माझी खात्री आहे, ते लोक तुमच्या आयुष्यात येण्यामागे काही प्रयोजन होतं.

लक्षात घ्या, तुम्हाला त्रास देणारे लोक खरं म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षमतांची आठवण करून देतात. आणि त्यांच्यामुळे तुम्हाला जो त्रास होतो तुम्ही करून घेतलात तर त्यातूनच तुम्हाला तुमच्यातल्या सुप्तशक्तीची जाणीव होते. त्रास व्हायच्या आधी तुम्हाला त्याची कल्पनाही नसते.

त्याला माहीत असतं की प्रेमळ आत्मा हे सगळं आपल्यावरच्या प्रेमापोटी करतोय, आपल्याला मदत करण्यासाठी करतोय.

मी तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे हे कदाचित वास्तवातही घडू शकतं. पूर्वी कधी कोणी तुम्हाला जखडून ठेवलं असा विचार करण्याऐवजी ती नवीन काही शिकण्यासाठी तुम्हाला दिलेली संधी होती असा विचार केला तर? तुमच्याशी खोटं बोलून, तुमचा विश्वासघात करून, तुमच्यावर टीका करून, तुम्हाला त्रास देऊन दुखावणाऱ्या प्रत्येक माणसाचा हेतू केवळ तुम्हाला मदत करण्याचा होता-असा विचार केला तर?

तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तुमच्या सवयीच्या झालेल्या अतिसामान्य आयुष्यातून तुम्हाला खेचून बाहेर काढायचं असेल तर? त्या अतिसामान्य आयुष्यात तुमची खुंटलेली प्रगती न पाहून तुम्ही एक समृद्ध आयुष्य जगावं अशी त्यांची इच्छा असेल तर? या समृद्ध आयुष्यात अपार कष्ट करून एक उत्तम व्यक्ती म्हणून तुमच्यातले समंजसपणा, सहिष्णुता, संयम, दुःखातही आनंदी रहाण्याची वृत्ती, चिकाटी, क्षमाशीलता आणि प्रेम असे गुण पुढे यावेत हा त्यांचा हेतू असेल तर? तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य घडवण्यासाठी, स्वतःला पुढचा मार्ग दाखवण्यासाठी सक्षम व्हावं आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत माणूस व्हावं, तुमच्या भाग्यात लिहिलंय तसं तुम्ही जगावं असं त्यांना वाटत असेल तर?

 

 

                                                                                                                              आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 लेखक – अज्ञात

error: Content is protected !!