आदित्य व उर्मिला सुट्टी मिळाल्याने कारने गावाला चालले होते. वाटेतच भेळ व पाणीपुरीचा एक प्रशस्त ढिय्या लागतो. खूप लोक येथे भेळ व पाणीपुरी खायला थांबतातच. तो ठिय्या पाहताच उर्मिला, आदित्यला म्हणाली, अरे तुला पाणीपुरी खायची का? आदित्यने नकारार्थी मान हलवली व तो शिट्टी वाजवत गाडी चालवू लागला. बऱ्याच वेळानंतर आदित्य उर्मिलाला म्हणाला, काय झालं गं? एवढी शांत का आहेस? तरीही उर्मिला गप्पच होती. आदित्यने उर्मिलाचा हात धरला व काय झाले गं? असे विचारले. तिने हात झिडकारत आदित्यला म्हटले. तुला गाडी थांबवायची इच्छा नाही ना. राहू दे, चालवत बस गाडी. आदित्य तिला म्हणाला, अगं तु कधी म्हणालीस गाडी थांबवं म्हणून. तेव्हा रडवेला चेहरा करत उर्मिला, आदित्यला म्हणाली, तुझं माझ्यावर प्रेमच नाही, मी तुला विचारलं, “तुला पाणीपुरी खायची का? म्हणजेच मला पाणीपुरी खायच आहे. एवढं साधं पण तुला कळू नये? आणि ती रडू लागली.
मित्रांनो बायका मनकवड्या असतात, त्यांना समोरच्याच्या मनातलं समजतं, त्यामुळे पुरुषांनाही आपल्या मनातलं कळावं असं त्यांना वाटतं. पुरुषांना निसर्गतः शब्दांनी सांगितल्यावरच कळत. म्हणून तुम्ही एखाद्या स्त्रीबरोबर फिरायला जात असाल तर तिने तुम्हाला पाणपुरी खायची का? तुम्हाला चहा प्यायचा का? असा कुठला प्रश्न विचारला तर तुम्हाला नको असेल तरी जागेवर गाडी त्या ठिय्याकडे वळवा व तिला जे हवे त्याची ऑर्डर द्या. व आनंदी रहा. (जनहितार्थ जारी.)
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
