प्रेम म्हणजे फक्त प्रियकर प्रेमिका यांचे प्रेम नाही तर प्रत्येक नात्यामध्ये एक अदृश्य असते ते खरे-प्रेम
कितीही जवळ जाणार असेल तरी
गाडी सावकाश चालव आणि
पोहचल्यावर फोन कर असे
आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम…..
कितीही मस्ती केली व रात्री लेट
झाले तरी आई-बाबांना न सांगता
हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा म्हणजे प्रेम……
कितीही वाद झाले तरी
जेवलास का अशी विचाणारी
प्रेमळ बहिण म्हणजे प्रेम.. …. ……
पगार कितीही कमी असला तरी
दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे
घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम….. .
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःच
काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा
डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम…..
कुणाचा रिप्लाय येवो अगर न येवो,
तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत
रहाणारे मित्र-मैत्रीण म्हणजे प्रेम…….
नातं कोणतंही असो त्यात प्रेम आणि विश्वास
असणं महत्वाच आहे,,,,,
निस्वार्थी पणाने रोज आठवण काढणे आणि काळजीपूर्वक मेसेज करणे हे ही प्रेमच,,,,,,,,,,,
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
