माणूस दुःखी कसा आणि केव्हा होतो?

 

खरं तर माणसाला दुःखी कोणी करूच शकत नाही, पण त्याच्या स्वीकारण्याच्या प्रवृत्तीने, नको त्या अपेक्षा बाळगल्याने तो साधारण दुःखी होतो. आपण एक उदाहरण घेऊ, समजा तुम्ही २०० रुपयांचा एक मातीचा माठ घेतला आणि त्याच दिवशी खास येणाऱ्या पाहुण्यांसाठी २५० रुपयाचा फुलांचा बूके घेतला. पाहुणे आले, स्वागत झाले, आणि गेलेही. संध्याकाळी कुणाच्यातरी चुकीने माठ फुटला, तर तुम्ही दुःखी व्हाल, कारण या माठाचे आयुष्य कमीत कमी १,२ वर्ष तुम्हाला अपेक्षित होते, आणि तो एका दिवसात फुटला म्हणून तुम्ही दुःखी झालात, पण त्याच वेळेस माठापेक्षा जास्त किंमतीच्या बुके हा संध्याकाळी केराच्या टोपलीत जाणार आहे हे माहिती होते म्हणून तुम्हाला त्याचे वाईट ही वाटले नाही किंवा तुम्ही दुःखी ही झालात नाही.

हीच तर गंमत आहे, खरं तर दुःख हे अपेक्षांमुळेच जास्त आहे, म्हातारे आई वडील जास्त दुःखी अपेक्षांमुळेच आहेत, ज्यांनी मुलांकडून खूप अपेक्षा बाळगल्या, ते जास्त दुःखी आहेत, ज्यांनी अपेक्षाच ठेवल्या नाहीत, ते सुखी आहेत.

दुःखाचे मूळ कारण अपेक्षा आहे (बहुतेक बऱ्याच ठीकाणी) तर आज पासून घरातील लोकांकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून काहीही अपेक्षा ठेऊ नका, मी गॅरंटी देतो, तुम्ही कधीही दुःखी होणार नाहीत.

सो, अपेक्षा सोडा, सुखी व्हा !!🙏🌹🙏

 

 

                                                                                                                                                               आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात 

error: Content is protected !!