कोणत्याही बदलाची प्रक्रिया सुरुवातीच्या काळात अवघड वाटते. मध्यंतराच्या काळात गोंधळ्यासारखे वाटते. आणि शेवटी अगदी सुंदर वाटते. कोणत्याही बदलाची प्रक्रिया सुरुवातीच्या काळात अवघड वाटते. मध्यंतराच्या काळात गोंधळ्यासारखे वाटते. आणि शेवटी अगदी सुंदर वाटते. कोणत्याही बदलाची प्रक्रिया सुरुवातीच्या काळात अवघड वाटते. मधल्या काळात गोंधळ्यासारखेवाटते. आणि शेवटी अगदी सुंदर वाटते. – ठीक आहे. ही वाक्यं लिहायचं आता मी थांबतो पण तुम्ही मला वचन द्या की हे वाक्य तुम्ही कधीच विसरणार नाही.
माणसात होणारा आंतरिक बदल किंवा माणसाचं संपूर्ण परिवर्तन सुरुवातीला खूप भयानक आणि अवघड वाटतं. तो बदल आपल्याला गोंधळात टाकतो. तसं झालं नाही तर त्या बदलाला खरा बदल म्हणताच येणार नाही. आणि मग त्या बदलाला काही किंमतच उरणार नाही.
अंतराळयानाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना जेवढं इंधन लागतं त्यापेक्षा जास्त इंधन ते यान उड्डाण करताना पहिल्या साठ सेकंदांत घेतं. तुम्हाला हे माहीत होतं का?
त्यामागचं कारण असं आहे की सुरुवातीला त्या यानाला गुरुत्वीय बल पृथ्वीकडे खेचत असतं. त्या बलावर मात करून त्याला अवकाशात झेप घ्यायची असते.
त्यासाठी त्याला प्रचंड ऊर्जा लागते कारण त्याला खूप जोरानं वर ढकलावं लागतं. जोपर्यंत अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक वेग गाठत नाही तोपर्यंत या ऊर्जेची गरज असते. जेव्हा अंतराळयान गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पडतं तेव्हा ते मुक्त असतं,अजून उंच जाण्यासाठी..
तुमच्या स्वप्नातलं आयुष्य जगण्यासाठी तुमच्यातही खूप मोठे बदल करणं आवश्यक असतं. त्या वेळी तुम्ही अंतराळयानासारखे असता.
पूर्वीच्या जीवनपद्धतीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप मोठी ऊर्जा लागते. खूप परिश्रम घ्यावे लागतात. तुमच्या पूर्वायुष्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून तुम्हाला बाहेर पडावं लागतं (हेच गुरुत्वीय बल तुमच्यातल्या क्षमतांना मागे खेचत असतं).
म्हणूनच सुरुवातीच्या काळात ते खूप कठीण असतं. त्यात काहीच चुकीचं नाही. उलट याचा अर्थ असा आहे की, तुम्ही स्वतःत घडवत असलेला बदल खूप महत्त्वाचा, मोलाचा, आणि किमती आहे. आधी जे खूप अवघड वाटत होतं तेच सगळं आता तुम्हाला सोपं वाटते आहे, नाही का?
नव्या सवयी, नवी कौशल्ये, नवं वर्तन प्रत्यक्षात आणणं हळूहळू सोपं होत जाईल याची खात्री बाळगा. सरावानं गोष्टी सोप्या होत जातात. जर एखादी गोष्ट तुम्ही काल करू शकला नाहीत तर याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट तुम्ही आज करू शकणार नाहीत. आज तुम्ही कालच्यापेक्षा प्रगती केलेली आहे. आणि तुमच्या गाठीशी असलेल्या अनुभवात चोवीस तासांची भर पडली आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
