लक्षात ठेवा, तुमची आवडती माणसं कायमस्वरूपी तुमच्याबरोबर नसतात

कबुलीः माझं केवळ माझ्या घरच्यांवरच प्रेम आहे असं नाही, माझ्या मित्रांवरही आहे. ज्यांच्याबरोबर काम करायला मला आवडतं अशा माझ्या सहकाऱ्यांच्या छानशा टीमवरही मी प्रेम करतो. माझं मार्गदर्शन घेणारे माझे क्लायंट्स आणि मला व्याख्यान देण्यासाठी बोलावणाऱ्या कंपन्या यांच्यावरही माझं प्रेम आहे. गेली पंचवीस वर्षं मला पुस्तकं लिहायची संधी देणाऱ्या माझ्या वाचकांवरही माझं प्रेम आहे.

 

मी या सगळ्यांशी वागताना एक नियम पाळतो. त्या नियमाचा मला खूप फायदा झालेला आहे. तो नियम तुम्हीही पाळावा असं मला मनापासून वाटतंय. तो नियम असाः ज्यांना तुम्ही भेटता त्या प्रत्येकाशी असं वागा की जणू काही ती तुमची शेवटचीच भेट आहे. कारण अपघात होत राहतात, माणसं हे जग सोडून जातात. आणीबाणीची परिस्थिती तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकते.

 

तुमच्या लाडक्या (आणि आवडत्या) लोकांबरोबर तुम्ही असता तेव्हा पूर्णपणे त्यांच्याबरोबरच असा – तुमचा फोन बघत बसण्याऐवजी (तुमच्यासमोर कोणीही बसलेलं असताना फोन किंवा तत्सम उपकरणांत डोकं खुपसून बसू नका. ते चुकीचं आहे. ते उद्धटपणाचं लक्षण आहे.) कारण लोक अनपेक्षितपणे आणि अचानकपणे हे जग सोडून जातात. ही खूपच टोकाची गोष्ट सांगितली मी. नेहमीच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी म्हणजे आपले सहकारी नोकरी सोडून जातात. आपले जोडीदार वयस्कर होतात आणि मूलं मोठी होतात. आपल्या अगदी जवळच्या लोकांना आपण गृहीत धरतो. ते आपल्याला सोडून जाईपर्यंत.

 

एक कथा. एक खूप खास माणूस होता. स्वभावानं खूप चांगला. अतिशय प्रेमळ. मनाचा मोठा. त्याच्या देशात मी लेखनाचं काम करायला गेलो होतो. त्याच्या देशातलं वातावरणही खूप उल्हासित करणारं होतं. मी एका छोट्या गावातल्या झोपडीवजा घरात लेखन करायचो. तिथे तो मला त्याच्या गाडीतून सोडायचा. नुकताच मी परत एकदा त्या ठिकाणी गेलो तर माझ्या स्वागताला नवीन चेहरा होता.

 

मी माझा मित्र कुठंय म्हणून विचारलं. “तो येऊ नाही शकला,” मला उत्तर मिळालं. तो नवीन माणूस थोडा वेळ शांत उभा राहिला. मग म्हणाला, “काही महिन्यांपूर्वी तो हे जग सोडून गेला. एके दिवशी मासेमारी करायला गेला होता. अचानक जमिनीवर कोसळला. परत उठलाच नाही. आम्ही अजून त्या धक्क्यातून सावरलेलो नाही. फक्त सदतीस वर्षांचा होता तो.”

 

म्हणून लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. लोक अचानक आपल्याला सोडून जाऊ शकतात. तुमच्या संपर्कातील लोकांबरोबर असलेले संबंध दृढ होण्यासाठी आणि या माणसांच्या श्रीमंतीत भर पडावी म्हणून प्रत्येकाशी चांगलं वागा. पुढे कधीतरी नक्कीच अशी वेळ येईल की तुम्हाला तुमच्या चांगल्या वागण्याचं खूप समाधान मिळालेलं असेल.

 

 

                        आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!