शब्द वापरायला पैसे नाही पडत, पण त्यांचा चुकीचा वापर महागात पडू शकतो. शब्दांना कुणी स्पर्श करू शकत नाही, पण शब्द कुणाच्याही मनाला स्पर्श करू शकतात.
कुणात काही उणीव असली तर ती त्याला जरूर समजावून सांगावी, पण प्रत्येकातच उणीव दिसत असेल तर आपण स्वतःलाच समजावण्याची गरज असते.
जीवन आणि काळ हे जगातले दोन शिक्षक असतात. आपल्या वेळेचा सदुपयोग करणं हे जीवन आपल्याला शिकवतं आणि आपल्या जीवनाचं मोल किती हे काळ आपल्याला शिकवतो.
संताप ही आपल्यातली अशी एक कला असते, ज्यात फसतोही आपण, गुंततोही आपण, आपणच पश्चात्तापही करतो आणि मागेही आपणच पडतो.
लांब धागा आणि लांब जीभ प्रायः नेहमीच गुंततात. म्हणूनच धाग्याला गुंडाळून ठेवावं आणि जिभेला आवरून धरावं.
बोलण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकतो, पण गप्प राहण्याचा कधीच नाही.
हसावं ना जरा, लोक दुःख कां करतात,
अहो, आयुष्यात तणाव सांगा कुणाच्या नसतात,
चांगलं किंवा वाईट हे मनाचे खेळ तेवढे असतात,
आयुष्यात सुख दुःख ऊन सावली सारखे येत जात असतात.
निसर्गाचे तीन अतिशय कठोर नियम जे सत्य आहेत!!!
१. निसर्गाचा पहिला नियम: जर शेतामध्ये बी पेरलं नाही तर निसर्ग त्या शेतामधे तण आणि गवत माजवतो!! अगदी त्याच प्रकारे आपल्या डोक्यात आपण सकारात्मक विचार ठेवले नाहीत तर आपल्या डोक्यात नकारात्मक विचार भरतात!!
२. निसर्गाचा दुसरा नियम: ज्याच्यापाशी जे असेल तेच तो दुसऱ्यांना देऊ शकतो!! जो सुखी असेल तो सुख देईल!! जो दुःखी आहे तो दुःखच वाटेल!! जो ज्ञानी आहे त्याच्याकडून ज्ञानच मिळेल!! जो कल्पनेतच वावरतो तो भ्रमात ठेवील!! जो गर्भगळीत झालेला असेल त्याच्याकडून भयच मिळेल!!
३. निसर्गाचा तिसरा नियम: आपल्याला आयुष्यात जे काही मिळतं त्याला पचवायला शिकलं पाहिजे कारण जेवण पचलं नाही तर रोग वाढतात, पैसा पचला नाही तर दिखाऊ पणा वाढतो, गोष्ट पचली नाही तर चुगल्या वाढतात, प्रशंसा पचली नाही तर अहंकार वाढतो, गुपित पचलं नाही तर धोका वाढतो, दुःख पचलं नाही तर निराशा वाढते, सुख पचलं नाही तर पाप वाढतं. हेच जीवनाचं सत्य आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
