शिस्तीत राहायचं भाऊ

 

गुलाब पूर्वीपासून गुन्हा प्रवृत्तीचा अनेक गुन्हें दहशत यामुळे त्याला तडीपार करणार होते नानांनी आपले राजकीय वजन वापरुन त्यावरची कारवाई थांबवली कृतज्ञतेपोटी गुलाब नानांना खूप रिस्पेक्ट द्यायचा. राजकीय वजनामुळ नानांना पण खूप अहंकार आला होता. कृतज्ञतेपोटी आदर करणाऱ्या ते बऱ्याचदा काहीही बोलायचे बऱ्याच वेळेला अपमान झाल्यामुळ मूळची भाईगिरी करणाऱ्या त्याच्या मनाला ओरखडे ओढले गेले गुलाबच्या गुलाबला मनात द्वेष खदखद लागला उपकाराच्या ओझ्याखाली नाना त्याला दावत होते हे त्याला असह्य झाले.
अपशब्द वापरले त्यातच एकदा लोकांसमोर गुलाब गुंड पण मला घाबरतो हे लोकांना दाखवण्यासाठी नानांनी गुलाबला एकेरी शब्दात एक्रोधयुक्त गुलाबचा दाबून ठेवलेला राग वर आला व त्याने लोकांसामेग्च नानांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली. सर्व प्रेसमध्ये बातम्या छापून आल्यामुळे नानांची बेईज्जत झाली.
मित्रांनो गुलाब रिस्पेक्ट करत होता. नानांनी लक्ष्मण रेषा पाळायला हवी होती. समोरचा माणूस हा कुठलाही प्रमुख नसला तरी त्याच्या घरचा प्रमुख असतो. त्याला आदराने वागवले पाहिजे याचा विसर नानांना पडला एखाद्याला मदत केली तरी त्याच्या स्वपणाला डिवचायचं नाही व लक्ष्मणरेषेत शिस्तीत राहायचं हे नानांना कळलं नाही.
वरील घटनेवरून अनेक लोकांनी मग ते नेते असोत, भाऊबंद असोत, वरिष्ठ असोत, प्रत्येकाने समोरच्याचा आदर करून लक्ष्मणरेषा ओळखून शिस्तीत राहायला पाहिजे, नाहीतर तुमचा नाना व्हायला वेळ लागणार नाही. कारण आजची पिढी बापाचं पण ऐकून घेत नाही.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!