समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर कोणत्याही बंधनात अडकू नये.
कारण, जेव्हा आपण नात्यांच्या बंधनात गुंततो तेव्हा चिंता वाढते.
स्वतःच्या आयुष्यापेक्षा इतरांच्या स्वार्थी नात्यांना जास्त महत्त्व द्यायला लागतो, तेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जातो.
आपलं आयुष्य आपल्याच हाती आहे.
बिनधास्त जगा!
एकटे आलो आहोत, आणि एकट्यालाच निघून जायचं आहे.
म्हणूनच, लोकांच्या चार बोलण्यांना काळजी समजून मनाला त्यात गुंतवू नका.
टेन्शन हे सगळ्यांनाच असतं
शाळेत जाणाऱ्या मुलांना वाटतं, हे अभ्यास कधी संपणार?
कॉलेजमध्ये असलेले अनेक प्रेमात अडकतात आणि चुकीच्या वळणावर जातात.
नंतर वाईट झालेलं आयुष्य सार्थकी लावण्याची चिंता त्यांना सतावत असते.
जॉब करणाऱ्यांना बॉसचं प्रेशर असतं.
तर शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नाही, ही चिंता अनेकांना असते.
चिंता, तणाव हे आयुष्याने दिलेलं एक अनाहूत पण वास्तव देणं आहे.
पण मित्रांनो, आयुष्य म्हणजेच एक परीक्षा आहे, बर का!
परंतु, जो खऱ्या अर्थाने कठीण परिश्रम करतो, त्याला यश नक्कीच लाभतं!
या दगदगीच्या आयुष्यात, जो स्वतःला वेळ देतो, स्वतःच्या विश्वात रमतो..
त्याच्यासाठी जगाची टीका, लोकांचे टोमणे महत्वाचे उरत नाहीत.
आणि खरं आयुष्य तिथूनच सुरू होतं…!
स्वतःसाठी जगण्यातच खरी समाधानाची गुरुकिल्ली दडलेली असते..!!
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
