स्वर्ग आणि नरक

एकदा एका शिष्याने गुरूला विचारले,’स्वर्ग’ कसा आहे,?’नरक’ कसा आहे ? हे मला जाणून घ्यायचे आहे.
त्याच्या गुरूने त्याला म्हटले, “डोळे बंद कर आणि बघ.”

 

शिष्याने डोळे बंद लेले आणि एका शांत शून्यामध्ये त्याने प्रवेश केला.त्याचा गुरु म्हणाला,”हा स्वर्ग पहा.”

 

मग थोड्या वेळाने गुरु म्हणाले, “आता नरक पहा.”

 

थोड्या वेळाने शिष्याने आश्चर्याने डोळे उघडले.
गुरूने विचारले,”काय बघितलेस?”
शिष्य म्हणाला,”लोकं ज्या गोष्टींची चर्चा करतात,त्या स्वर्गांत मला कुठेही दिसल्या नाहीत. अमृताच्या नद्या दिसल्या नाहीत की सोन्याचे महाल दिसले नाहीत, तिथे तर काहीच नव्हते आणि नरकात सुद्धा काहीही नव्हते. आगीच्या ज्वाला नव्हत्या की पीडितांचे आक्रंदन नव्हते.असे का व्हावे?की मला दिसला तो स्वर्ग नव्हता आणि नरकही नव्हता?”

 

त्यावर त्याचे गुरु हसायला लागले.आणि म्हणाले,”तू पाहिलास तो ‘स्वर्ग’ही होता आणि ‘नरक’ही होता.*परंतु अमृताच्या नद्या आणि सोन्याचे महाल किंवा आगीच्या ज्वाळा आणि पीडितांचे आक्रंदन हे तिथे स्वत:लाच न्यावे लागते.ह्या गोष्टी तेथे मिळत नाहीत.आम्ही ज्या गोष्टीबरोबर घेऊन जाऊ तेवढ्याच तिथे सापडतात.स्वर्ग म्हणजे आपण स्वत: आणि नरक म्हणजे आपण स्वत:च.”

 

 

 

 

बोध

 

जीवन जगताना आपण स्वत: मध्ये सारे काहीं दडवले जाते, जशी पेरणी करावी तशीच कापणी करावी लागते.

 

 

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

लेखक – अज्ञात

 

error: Content is protected !!