साधारण चाळीस वर्षं मागे जाऊन पाहू. स्वयंपाकघरात यंत्र नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूट करण्यासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणच, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वतः लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. 🥘✨
गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात, की तांब्या-पितळेची भांडी असायची. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. दूध, ताक, लोणी, घरच कढवलेल शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकासाठी घाण्याच तेल वापरल जायच. चणे, फुटाणे, शेंगदाणे अस खाण अगदी सहज व्हायच. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायच नाही. कैऱ्या, बोर, आवळे, करवंद, जांभळ, चिंचा ही फळ भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुल ही फळ भरपूर खातात ? 🍇🍒🌿
कपडे हाताने घासावे लागत, धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वतः धूत असे. ती सवय घराघरात होती. माणस शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, तिन्ही सांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचीच. 🚶♀️🚲🥛
जेवणही रात्री आठच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवण रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर सिरियल्स पाहत पाहत! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुल एकत्र झोपत असत. 🌙📺
या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वतःसाठीही आणि इतरांसाठीही! आयुष्य आता इतकं गतिमान नव्हत, पुष्कळ संथ होत. पण त्यामुळे थकवा नव्हता. “लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा” हे तत्व माणस दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळे, त्यांना आयुष्य जगता आल. राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याच एक प्रमुख कारण असाव. आज आपल आयुष्य नुसत धावपळ करण्यातच जातय..!
लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायच. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रूसवे फुगवे होते, पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारख नव्हतच. बंद दार नव्हती. दारांना कुलप नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होत आणि रितही होती. माणस सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याच बळ अंगी यायच. धीर वाटायचा. 👫💪
आज “स्वतंत्रतेच्या” नादात हे सगळ आपण विसरलो आहोत आणि एकट्यान चालायच ठरवल. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, तर थकवा येणारच.
त्यावेळी माणस फार साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होती. साधेपणातच त्यांना शांती मिळत होती. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आम्ही ते हरवलय, पण त्यावेळच्या जीवनाचा विचार केल्यावर आम्हाला कळत की साधेच आयुष्य सुखी होत. त्या काळात कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांना मदत करत होता, एकमेकांसाठी वेळ देत होता. प्रत्येक लहान गोष्टीत आनंद शोधता येत होता. घरातल प्रेम, त्याचं समर्थन, आणि शांतता हे त्या काळाच मोठ आकर्षण होत. त्या साध्या पण समृद्ध जीवनात शारीरिक कष्ट होते, पण मानसिक समाधान होत. 💖
त्या काळात एक गोष्ट खूप स्पष्ट होती प्रत्येक कुटुंबातील सदस्य एकमेकांसाठी जास्त वेळ देत होता, आणि समाजातील सर्वांगीण सहकार्यामुळे तणाव कमी आणि मनाची शांती जास्त होती. माणस एकत्र होऊन जीवनाच्या कठीण प्रसंगांना सामोरे जात होती, आणि त्यामुळे मानसिक अशांततेचा कोणताही प्रश्न नव्हता. 🕊️
आजकालच्या “स्वतंत्रतेच्या” नादात हे सगळ आपण विसरलो आहोत आणि एकट्याने चालायचे ठरवले. जीवनावर नियंत्रण ठेवताना, आम्ही साधेपणाच्या महत्त्वाला हरवले. त्यामुळे, आता एकट्याने लढण्याची गरज नाही, तुम्ही एकमेकांसोबत असाल, तर थकवा येणारच नाही… ✨
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
