समाधान…

♦  समाधान…  ♦

 

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली; पण तितक्यात वाटेत तिला डाळीचा ही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, “क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाची ही सोय झाली.” पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, “वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.”
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.
माणसाचं ही असंच आहे, जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो; पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतला जातो.
निःस्वार्थीपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा, कारण स्वार्थापोटी माणसाचा हव्यास वाढत जातो, अन् वाढत्या हव्यासामुळे आपले कर्तृत्व रसातळाला जाते.
सुखासाठी धडपड हवी; पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. असं कुठलंच सुख नाही, जे आयुष्यभरासाठी समाधान देईल; पण समाधानातच इतकं सुख आहे, जे आयुष्यभरासाठी पुरुन जाईल.
आप आपल्यापरीने निःस्वार्थीपणे केलेली जनसेवा हीच ईश्वररुपी निसर्गाची सेवा, यालाच प्रमाण मानून व्यतीत केलेल्या जीवनातच खरे सौख्य अन् समाधान लाभते.
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखा पेक्षा समाधान शोधा. आयुष्य खुप आनंदात जाईल.
आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्या एवढी सोपी आहेत; पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण, यशाची व्याख्या लोकं ठरवितात, आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
समाधान ही अंत:करणाची, सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली, तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.

 

-अज्ञात लेखक

 

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!