मागे पडल्यावरही तुम्हाला शर्यत जिंकायची का?

 

नुसते परिश्रम करून तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही, तर तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, यशस्वी व्हायचे असेल तर दिवसातील झोपेची वेळ वगळता प्रत्येक मिनिटाला कठोर परिश्रम करण्यास शिका. तुम्ही जेवढे तास अधिक काम कराल तेवढे त्या कामातून तुम्हाला ‘रीटर्न’ मिळेल. तुम्ही शर्यतीत मागे पडले असाल तर तुम्हाला अधिक वेगाने धावावे लागेल. तरच तुम्ही शर्यत जिंकू शकाल,

आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवायचे असेल तर, स्वतःसाठी जोखीम घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमचे वय वाढेल तेव्हा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. तुमच्यावर बंधने आणि मर्यादा येतील, त्यामुळे स्वतःसाठी निर्णय घेण्याची हीच ती वेळ आहे. मी( इलोन मस्क) आणि माझा भाऊ आम्ही आमची पहिली कंपनी सुरू करीत होतो, तेव्हा आम्ही घराऐवजी एक छोटेसे ऑफिस भाड्याने घेतले. आम्ही तिथेच सोफ्यावर झोपायचो. आठवड्याचे सात दिवस आम्ही दिवस-रात्र काम करायचो. कुणी आठवड्यात ५० तास काम करीत असेल तर तुम्ही शंभर तास काम करा. त्यामुळे तुम्ही दुप्पट पुढे जाल. तुम्ही असे वर्षभर केले तर खूप पुढे निघून जाल.

छोटे निर्णय घ्या

तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज आहे. चुकांमधून शिका. स्वतःसाठी छोटे-छोटे निर्णय घ्या. यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तोच एक दिवसं तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाईल.

तुलना करू नका, तर… आपण स्वतःची तुलना

इतरांशी कधीही करू नये. त्याऐवजी आपण स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवला पाहिजे. इतरांशी तुलना करणे हीच बाब तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते.

■ यातून आपण स्वतःला कमकुवत आणि इतरांना सक्षम समजू लागतो आणि मागे पडतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्यापेक्षा त्यांच्या कामातून प्रेरणा घ्या. ‘ते करू शकतात तर मी का नाही?’ असा विचार करा.

… जर तुम्ही हे केलं तर तुमची प्रगती खुंटली असे समजा

■ नवीन गोष्टी सुरू करण्यास कधीही घाबरू नका

■ कामाविषयी तुमच्यात जिद्द निर्माण करा.

■ अपयश हा एक पर्याय आहे. तुम्ही अपयशी होत नसाल तर तुमची प्रगती खुंटली असे समजा.

■ स्मार्ट लोक तेच असतात जे स्वतःला कुठेही अॅडजेस्ट करून काम करू शकतात.

 

                                                                                                                                           आपला परिवार नागेबाबा परिवार

 

संकलन : महेश घोराळे

error: Content is protected !!