यात कोणताही आवाज नव्हता. ती शांततेने भरलेली भाषा होती. कॅप्टन रोहित चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन दोन्ही हात वर करून म्हणाला, उचलून मार. मैदानावर उपस्थित असलेला त्याचा जोडीदारही त्याच्यासाठी स्वतःच्या धावांशी तडजोड करत होता. विराटकडे असा चेंडू आला, ज्यावर तो सहज दोन धावा घेऊन भारताला विजय मिळवून देऊ शकला असता, पण दुबईच्या. या सुंदर स्टेडियममध्ये विराटच्या शतकासाठी प्रार्थना करणाऱ्या हजारो प्रेक्षकांसोबत जगभरातील प्रेक्षकही त्याच्या शतकासाठी प्रार्थना करत होते. दोन धावा काढून त्याने ही संधी गमावावी, असे कोणालाही वाटत नव्हते. त्याने चौकार मारावा, अशी लाखो चाहत्यांची इच्छा होती. त्या वेळी शांत राहणे कोणालाही कठीण असते. बाहेर आणि आतही खूप आवाज होता, कारण त्याच्या आतला क्रिकेटपटू इत इतक्या जवळ आल्यानंतर आपले शतक चुकवू इच्छित नव्हता. पण, त्याने त्या आवाजावर मात केली आणि त्याची आंतरिक शांती राखली. तो खुशदिल शाहचा चेंडू खेळण्यास तयार होता. तो क्रीझबाहेर आला, एक बटर ड्राइव्ह मारून चौकार मारला आणि ५१ वे शतक पूर्ण केले.
हा विक्रम महान सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या विक्रमापेक्षा दोन शतकांनी जास्त आहे. त्याने आपले हेल्मेट काढले, गर्दीचे स्वागत केले आणि सांकेतिक भाषेत आपल्या कॅप्टनला सांगितले, ‘मी आहे ना’. आणि हीच बाहेरील आवाजाला आत येऊ न देऊन आतून शांत राहण्याची शक्ती आहे. सामन्यानंतरच्या टीव्ही मुलाखतीत त्याने याची पुष्टी केली आणि म्हणाला, ‘मला माझ्या खेळाची चांगली समज आहे, ती बाहेरील आवाज दूर ठेवण्याबद्दल, मयदित राहून आणि ऊर्जेची पातळी व विचारांची काळजी घेण्याबद्दल आहे. माझे काम वर्तमानात राहणे आणि संघासाठी काम करणे आहे. मी स्वतःला सांगतो की, मैदानावरील प्रत्येक चेंडूवर माझे १०० टक्के दे आणि मग देव तुम्हाला त्याचे फळ देईल. स्पष्टता असणे महत्त्वाचे आहे, हे समजून घेणेमहत्त्वाचे आहे की, चेंडूला गती असते तेव्हा तुम्हाला धावा काढाव्या लागतात, अन्यथा फिरकी गोलंदाज स्थितीवर नियंत्रण मिळवू शकतात.’ त्याच्यातील या शांततेनेच त्याच्या टीकाकारांना शांत करण्यास मदत केली आणि हे सिद्ध केले की, त्याच्याकडे अजूनही देशासाठी सामना जिंकण्याची शक्ती आहे, जी नेहमीच महत्त्वाची मानली जाते. तो इथेच थांबला नाही. तो कधीही कॅमेऱ्यासमोर १०० धावा कशा साध्यि केल्या याचे गुणगान करू इच्छित नाही. पण, त्याने त्याच्या मुलाखतीत म्हटले की, ‘रोहितची विकेट लवकर पडलेल्या सामन्यात योगदान देणे चांगले वाटते. शाहीनविरुद्ध शुभमनने चांगली कामगिरी केली. म्हणूनच तो जगातील नंबर वन फलंदाज आहे.’ धावा करण्यात मदत केल्याबद्दल त्याने श्रेयसचे कौतुकही केले. विजेते नेमके हेच करतात् डाटात ते जयजयकार आणि टाळ्यांच्या कडकडाटात शांतपणे निघून जातात. यशस्वी लोकांना स्वतःभोवती एक फिल्टर लावण्याची सवय असते, जेणेकरून ते दोन्ही प्रकारच्या लोकांना प्रशंसा करणारे आणि टीका करणारे बाहेर ठेवू शकतील आणि ते किती -चांगले आहेत हे सिद्ध करू शकतील.
सोमवारी सकाळी ६.५५ वाजता मी माझा कॉलमी लिहिणार होतो तेव्हा अजमेरच्या किशनगढ येथील दैनिक भास्करचे वाचक आणि शिक्षक बिरदीचंद मालाकर यांनी मला लिहिले की, ‘आमच्या भागातील बहुतांश विद्यार्थी आयफोन दर्जाचे नाहीत, (त्याचा अर्थ आर्थिक पातळी होता) आणि त्यांनी मला विनंती केली की, आता परीक्षा देणाऱ्या लोअर स्टैंडर्ड (अल्प उत्पन्न स्तराच्या) विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लिहावे. आणि मग मी विराटच्या फिल्टरबद्दल लिहिण्याचा निर्णय घेतला, ज्याने त्याला रविवारी रात्री हे यश मिळवण्यास मदत केली. फंडा असा की, या गोंधळलेल्या जगात काही लोक तुमची प्रशंसा करतील आणि काही लोक तुमचीनीत्र टीका करतील, तेव्हा स्वतःमध्ये एक फिल्टर तयार करा, जेणेकरून तुम्ही कोणाच्याही प्रभावाखाली येणार नाहीत.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
