राग एक शिकवन

काल परवा एका मर्डर केस मधील आरोपी ला जमानत कामी भेटण्या करीता आणि वकीलपत्र वर सही घेण्याकरीता यवतमाळ येथील जिल्हा कारागृह येथे गेलेलो होतो, परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे वकील पत्रावर सही आणि भेटण्या करीता 3.30 वाजे पर्यंत थांबावे लागणार होते. त्यामुळे थोडी विचारपूस करण्या करीता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना, मला एक कैद्याचे कपडे घालून असलेला एक व्यक्ती दिसला जो कारागृह समोरील मैदानाची साफ सफाई करीत होता. मी त्याच्याकडून कारागृह प्रशासन च्या वेळी आणि इतर माहिती घेतली. तो स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी व्यक्ती सारखा भासत होता. मी त्याच्या स्वभाव बघून त्याला त्याचे नाव गाव विचारले त्यावर त्यांनी रमेश (बदलेले नाव ) आणि गाव वणी( बदललेले ठिकाण )सांगितले. त्यानंतर संभाषण वाढविण्यासाठी मी त्याला कोणत्या गुन्ह्या मध्ये अटक आहात आणि केस अंडर ट्रायल चालू आहे का? त्यावर तो म्हणाला कि, मी 302(खून ) च्या केस मध्ये अटक आहे आणि सध्या अंडर ट्रायल नाही तर मला जन्मठेप ची शिक्षा झालेली आहे परंतु मी माझ्या्क घरातील लोकांनी सादर शिक्षे विरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली असल्याचे सांगितले.

त्यावर मी त्याला सहज पणे विचारले कि तुम्ही तर एकदाम शांत आणि संयमी दिसतोस आणि बोलन्या वरून सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा दिसतोस तु मर्डर केला या गोष्टीवर माझा विश्वास पटत नाही असे म्हंटले. त्यावर रमेश म्हणाला कि, हो साहेब सुशिक्षित आणि चांगल्या घरातील आहे, वडील नौकरी करीत होते आणि मी मेडिकल (बी ए एम एस ) करीत होतो, परंतु खून मीच केलेला आहे, त्यावर अवाक होऊन मी त्याला विचारले एवढे असताना खून का केला असे विचारले असता तो म्हणाला कि, तो खून मी नाही केला तर माझ्या रागाने केला असे म्हणाला. आणि समोर सांगायला सुरुवात केली कि तो 18-19 वर्षाचा असताना खूप जास्त रागीट होता आणि चीड चीड करीत होता , एक दिवस त्याच्या वडिलांचे आणि बाजूच्या व्यक्तीचे थोडे भांडण झाले होते, समोर चा व्यक्ती त्याच्या वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करीत होता, त्यामुळे त्याला राग आणावर झाला आणि त्यांनी बाजूला पडलेला कुशा (जमीन खोदन्या ठी चे हत्यार ) उचलला आणि सरळ त्याच्या डोक्यात मारला आणि त्यावर तो तिथेच खाली पडला आणि जाग्यावरच मेला असे सांगितले. त्यानंतर मला पोलिसांनी पकडले आणि तेव्हापासून मी जेल मध्ये आहे. त्या घटनेला माझ्या वडिलांनी स्वतःला जबाबदार धरले आणि खूप जास्त मानसिक ताण घेतला आणि इतका हुशार आणि सुशिक्षित मुलगा जेल मध्ये माझ्या मुळेच गेला असे वाटले त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यामुळे तुकची नौकरी गेली आणि त्यांनते ते वेड्या सारखे करायला लागले आणि आता इकडे तिकडे फिरत असतात. खूप साऱ्या वकिलांनी माझ्या आईला तुमच्या मुलांना जामीन मिळवून देतो त्याला निर्दोष सोडवतो असे म्हणूनं माझ्या आई कडून बरेच पैसे घेतले आणि इकडे मला शिक्षा झाली.मला एक भाऊ व एक बहीण आहे . केस करीता पैसे लागले आणि बाबाची नौकरी गेल्यामुळे घरची परिस्थिती सुद्धा खूप खराब झाली. मी खून करून जेल मध्ये आल्यानंतर कोणीच माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार नसल्यामुळे तिचे लग्न माझ्या आत्याच्या दारुड्या मुलांशी च करुनं दिले. आणि माझा भाऊ फार्मसी करीता होता परंतु वडिलांची मानसिक स्थिती ही बिघडलेली असल्यामुळे आणि केसेस साठी पैसे लागत असल्यामुले त्यांनी त्याचे सुद्धा शिक्षण सोडले आणि आता तो शेतात आणि बाहेर चे काम करून आई वडिलांना पोसत आहे असे सांगितले.

त्यावर मी रमेश ला विचारले कि, तुला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही का? त्यावर तो म्हणाला मी ज्याला मारले तो तर काही वेळात च मेला पण त्याला मारल्या नंतर मी रोजच मरत असतो. मी रोज मरण यातना भोगत असतो असे म्हणाला. साहेब त्या दिवशी माझ्या रागाने फक्त एकच खून नाही केला तर मी माझ्या घरातील सर्वांचा खून केला असे म्हणून रडत च निघून गेला.आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले.

वरची घटना किती मोठी शिकवण देणारी आहे, छोटाश्या रागाने एक सुशिक्षित आणि सुसंकृत कुटुंब मातीला मिळवले. एक नौकरी वाला व्यक्ती रस्त्याने वेडा म्हणून फिरतो, एक डॉक्टर होणारी व्यक्ती जेल मध्ये आहे. एक औषधंशास्त्राचा विद्यार्थी शेतात काम करतो, एका सुंदर मुलीला दारुड्या व्यक्तीशी संसार करावा लागत आहे. एका आईला एका मुलाशिवाय आणि पती शिवाय जगावे लागत आहे.

त्यामुळे सर्वांनी रागाला आपल्यावर हावी नं होऊ देता, संयम आणि प्रेमाने विचार करुनं च सर्व करावे.

 

                        आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – ऍड. सतीश एस राऊत.

 

error: Content is protected !!