यश तुमची वाट पाहत आहे….

नमस्कार… मी धनंजय देशपांडे…

१) २८ वर्षापूर्वी ५० रुपये घेवून लातूर येथून पुण्यात आलो. गरिबांसाठीच्या वसतिगृहात राहून जेवून ७० रुपयात सोय झाली. पण तेव्हढेहि पैसे नव्हते…. म्हणून ४ तासाची पार्ट टाईम नोकरी केली. रखवालदारापासून सर्व प्रकारच्या नोकर्या केल्या. (ज्या पीवायसी मैदानाचा रखवालदार होतो तिथेच परवा चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो)
२) प्रेम विवाह केला. पण माझ्याकडे पैसे नसल्याने १३ मित्रांनी १३०० रुपये गोळा केले. आळंदीत लग्न झाले. (सुनील शेजाळे…. ऐकतोस न…)
३) घर नसल्याने लग्नानंतरहि १५ दिवस दोघे वेगळे (वसतिगृहात) राहत होतो. पत्र्याच्या दोन खोलीत संसार सुरु झाला. (त्याच जागी आज स्वतःचा टेरेस flat आहे.)
४) २५ वर्षापूर्वी टिळक रोडवर जिथे ७०० रुपयावर हरकाम्याचे काम करीत होतो…. त्याच जागेत आज माझे स्वतःचे ऑफिस आहे.
५) कामातच देव पाहिल्याने २०११ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला सुद्धा जाऊ शकलो नाही. बाकी टीम गेली होती.
६) वेगळ्या वाटेने जाणार्या ७० महिलांच्या सत्यकथा लिहिल्या. यातून अनेक मुलीना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला.
७) सामाजिक कामाबद्दल १३ पुरस्कार मिळाले.
८) व पु काळे सारख्यांनी माझी पत्रे त्यांच्या पुस्तकात छापली आहेत.
९) खडतर दिवसात साथ देणारी पत्नी मिळाली. आजवर २५ वर्षात तिला एक साडी सुद्धा मी दिली नाही…. तिचे ती manage करते. तरी ती समाधानी आहे..! ती आहे म्हणून मी आहे. हे नक्की….!
——————————————–

आता मला सांगा मित्रानो…. माझ्या सारख्या खेड्यातल्या मुलाला हे जमते…. तर बाकीच्यांना काय अवघड आहे….? उठा…. जागे व्हा….. यश तुमची वाट पाहत आहे.

 

लेखक – धनंजय देशपांडे.

error: Content is protected !!