गरज

#  गरज  #

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा !

बऱ्याच लोकांना असे वाटते की, आपल्याला कोणी बोलवत नाही, आपल्याकडे कोणी येत जात नाही, आपला कधीच कसा कुठे मान सन्मान होत नाही, असा गैरसमज असतो, परंतु ही माणसं त्यामागची कारणे, त्यांची कर्तव्ये त्यांच्या कर्तृत्वाकडे कधीच पहात नाहीत. पहा नां, फुल कितीही सुंदर असू द्यात कौतुक त्याच्या सुंगधाचं होतं, माणूस कितीही मोठा असू द्यात, कौतुक त्याच्या गुणांचे होते. आणि याच गुणांमुळेच त्या सुगंधित फुला बरोबरंच गुणवंत माणसाचीही समाजात गरज निर्माण होते, अशी गरज तुम्ही जिथे जाल तिथे निर्माण होईल असं काम अशी कर्तव्यनिष्ठा, अशी कर्तबगारी दाखवा की सगळेच तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतील, तुमच्या सहवासात राहण्यासाठी इच्छुक असतील.

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

-एक लेखक

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!