## चिकाटी ##
मोठमोठी कामे ताकदीने नाही, तर चिकाटीतून होतात ।
बहुतांशी कामे अशी असतात की जिथे ताकदीची नव्हे तर चिकाटीची गरज असते, पहा नां, एकाच दगडावर सतत पाण्याची (संततधार) एखादी धार पडत राहिली तर दगडालाही छिद्र पडते. त्यासाठी कामात सातत्य, चिकाटी ही महत्वाची ठरते. तुमच्या कोणत्याही कामात अनावश्यक ताकद लावण्यापेक्षा चिकाटी, सातत्य ठेवल्याने काही कालांतराने का होईना परंतु तुम्हाला हमखास यश मिळेल, आजवरच्या यशस्वी मोठमोठ्या व्यक्तींची मोठमोठी कामे, उद्योग व्यवसाय हे आजवर ताकदीच्या जोरावर नव्हे तर चिकाटी आणि सातत्यातूनच यशस्वी झालेली आहेत. हा इतिहास आहे. ज्याचे अनेक थोर पुरुष, उद्योजक, खेळाडू, राजकारणी तसेच अगदी वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विचारवंत सुध्दा याचे उदाहरण आहेत. तुम्हीसुध्दा नको तिथं ताकद वापरु नका, चिकाटी ठेवा आणि पहा, नकारात्मक कामेसुध्दा पहाता पहाता सकारात्मक होतील.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-एक लेखक
असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S
