कल्पनाशक्तीचा विकास

एका व्यक्तीने राजाच्या दरबारात जाऊन तिथल्या साऱ्या विद्वानांना आव्हान दिलं, “मी जे सांगतो ते करून दाखवलं, तर मी आपली विद्वत्ता मान्य करून माझी हार मानेन…!” राजाने आपल्या पदरी असणाऱ्या विद्वानांच्या वतीने त्याचं आव्हान स्वीकारलं त्या व्यक्तीने कोंबडीचं अंडं दाखवून सांगितलं,
“हे अंडं कुठल्याही
आधाराशिवाय जमिनीवर उभं ठेवून दाखवावं.” सारेजण प्रयत्न करू लागले… पण अंडं उभं राहिना… सारे थकले साऱ्यांनी एका सुरात सांगितलं, “या अंड्याचा आकारच असा आहे की, ते उभंच राहू शकत नाही त्या व्यक्तीनेच हे करून दाखवावं!”
साऱ्या विद्वानांनी आपली हार मान्य केल्यावर ती व्यक्ती पुढे आली. तिने ते अंडं हातात घेतलं आणि तळाच्या बाजूला किंचित फोडलं आणि उभं केलं. अंडं विनासायास उभं राहिलं.
ते पाहताच सारे उद्गारले, अरे, हे तर आम्हीही केलं असतं! तसा तो व्यक्ती म्हणाला, ‘केलं असतं… पण केलं नाही. कारण हे करण्यासाठी आधी ते जमलं नाही, कारण अंडं तळाशी फोडावं, हे तुम्हाला सुचलं नाही
तुम्हाला सुचलं नाही!’ हे सुचणं महत्त्वाचं। तीच कल्पनाशक्ती ! नुसती विद्वत्ता असून चालत नाही. विद्वत्तेचा अचूक आणि प्रभावी वापर करणारी कल्पनाशक्ती हवी! आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीचा विकास करायचा असेल तर आपण आपल्या मनाची सबलता वाढवणे गरजेचे आहे. सबल व निर्मल मनात कल्पना शक्तीचा विकास होऊ शकतो. म्हणून मनाला सबल व निर्मल करण्यासाठी रोज ध्यानधारणा करा आनापान सती हे त्यातीलच एक शास्त्रोक्त शुद्ध ज्ञान. शांतपणे मांडी घालून बसा व येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाचं डोळे बंद करून तटस्थपणे निरीक्षण करा, म्हणजेच येणारा जाणारा श्वास जाणत राहा.. रोज दहा मिनिटं सकाळी व दहा मिनिटे सायंकाळी या ध्यानाचा सराव करा. निश्चितच तुमच्या मनाची सबलता वाढवून कल्पनाशक्तीचा विकास होईल…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

 

error: Content is protected !!