वर्षानुवर्ष, सातत्याने, तुम्हाला मुलांनी जसं वागायला पहिजे असं तुम्हाला वाटतं, त्या पद्धतीच्या वर्तनाचा आदर्श तुम्ही त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे. मुलांनी कपडे व्यवस्थित घालावी, त्यांची केशभूषा नीटनेटकी ठेवावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही देखील तुमची केशभूषा व्यवस्थित केली पाहिजे. तुमची मुलं व्यवस्थित राहावी, असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः देखील व्यवस्थित राहिले पाहिजे आणि सफाईदार, चांगले काम करून त्यांना मार्ग दाखवला पाहिजे.
आयुष्यभर तुमची मुलं प्रत्येक दिवशी, ‘तुम्ही जसं वागता, तसं वागणार आहेत’ हे लक्षात ठेवा. आत्तापासून पुढे, कित्येक वर्ष, तुमच्या मुलांच्या आयुष्यांतील संधींवर, तुमच्या वर्तनाचे परिणाम होणार आहेत, हे जाणून तुम्ही हा विचार करायला बाध्य होऊन उच्च पातळीचं आणि स्वयंशिस्त ह्यांचे आचरण करा.
तुम्ही केलेली सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती असेल, तर मुलांना वाढवतानाची शिस्त; म्हणजे मुलांमध्ये उच्च प्रतीचा स्वयंगौरव, सकारात्मक असणं आणि आत्मविश्वासपूर्ण असणं, त्यांचा नैतिक मूल्यांवर विश्वास असणं, यासारखे चांगले संस्कार मुलांवर जन्मापासून केले तर मुलांच्या संगोपनाचे परिणाम टिकून राहतील लक्षात ठेवा मुल ही तुमचा अनुकरण करत असतात. तुम्ही सारखं मोबाईलवर असाल तर, मुलं देखील मोबाईल कडेच जातील. आई-बाबा हे मुलाचे हीरो-हीरोइन असतात. लहान मुलांना ‘बाप्पाच्या पाया पड’ म्हटले की, मोठेपणी ऑटोमॅटिक मंदिर दिसले की त्यांचे हात जोडले जातात. म्हणून लहान मुलांसमोर घरात भांडण करणे, व्यसन करणे, खोटे बोलणे, बेशिस्त वागणे, असभ्य भाषा वापरणे तसेच त्यांच्यावर दादागिरी करणे टाळा. त्यांच्यासमोर तुम्ही नैतिकतेने वागा. तुम्ही आदर्श जीवन जगा. हीच मुले तुम्हाला फॉलो करताना दिसतील. तुमच्यात नैतिकता असेल तर, मुलांमध्ये ती उतरणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वतः आदर्श बना. आपल्या मुलांसाठी आई-वडील हे ‘रोल मॉडेल’ असले पाहिजेत. त्यासाठी स्वतः सर्व गुण संपन्न व्हा व नंतर मुलांना उपदेश द्या. कारण मुले ही अनुकरणप्रिय असतात.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
