प्रसाद व सायली दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर सकाळी ८ ला घराबाहेर पडले कि सायंकाळी उशीरा घरी पोहचायचे त्यांचा मुलगा चिनू (चिन्मय) वय वर्षे ८ हा त्यांच्यात मिसळत नाही. त्यांच्याशी बोलत नाही
अशी या दांपत्याची तक्रार होती.
केस स्टडी करून लक्षात आले कि दिवसभर चिन्मयला सांभाळण्यासाठी जवळच विडी कामगार वसाहतीतील शांताबाई कामासाठी नियुक्त केली होती रोज १० ते १२ तास चिन्मय शांतामावशी बरोबर असायचा. त्याला शाळेत सोडणे, जेवू घालणे, त्याच्याबरोबर गप्पा मारणे अर्थात शांताबाईने चिन्मयला आईपेक्षाही जास्त प्रेम दिलं होतं. दिवसभर शांतामावशी मराठी चॅनेल किंवा बातम्या किंवा रेडिओवरची गाणी ऐकायच्या. ग्रामीण भाषेत चिन्मयशी गप्पा मारायच्या, त्याला गावाकडच्या गोष्टी कथा सांगायच्या थोडक्यात चिन्मय मध्यमवर्गीय राहणीमानाशी पूर्णतः जुळला होता. जेवण करताना मांडी घालून बसणे, आंघोळ करताना बादली-मग चा वापर करणे वगैरे. शनिवार रविवार चिन्मयचे आईबाबा सुट्टी असल्याने चिन्मयला शॉवर बाथ, डायनिंग टेबलवरचे चमच्याने जेवणे, इंग्रजी बातम्या, चॅनेल पाहणे, त्याच्याशी इंग्रजीत संभाषण करणे यामुळे चिन्मय एकदम मध्यमवर्गीय राहणीमान आचरणातून, हायक्लास राहणीमानात ओढला जाताना अनकम्फर्ट (अस्वस्थ) व्हायचा व आई- बाबांबरोबर पूर्णतः समर्पण (मिसळणे) टाळायचा.
शांतामावशी चिन्मयला रोज शाबासकी देणे, पाठ थोपटणे, मिठी देणे.
या गोष्टी आईबाबांकडून त्याला मिळाल्याच नव्हत्या त्यामुळे चिन्मय त्यांच्याशी मिसळायला टाळायचा
प्रसाद व सायलीला मी चिन्मयला जास्तीत जास्त वेळ देण्याचा व त्याला प्रेम, कौतुक, स्पर्श (मिठी) देण्याचा सल्ला दिला त्यांनी तो आनंदाने मान्य केला.
मित्रांनो आपल्या मुलांना वेळ, मिठी, कौतुक, आदर द्या ही त्यांची भूक आहे. मुन्नाभाई एमबीबीएस मधील आदर, प्रेम, कौतुक व जादू की झप्पी काय करू शकते हे तुम्ही पाहिलंच असेल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
