तुझे आहे तुजपाशी

आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी रहात होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, “तुझ्याकडे अंगठ्याएवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील.” त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही. त्या माणसाने केलेलं हिऱ्यांचं वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं!

दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिन्ऱ्यांच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालथं घातलं, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मनःस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली.

इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तेथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला, “हाफिज परत आला काय?” शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, “नाही. पण आपण असा प्रश्न का विचारता आहात?” तो विद्वान म्हणाला, “तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे- मी पाहताक्षणीच ओळखलं.” नवीन मालक म्हणाला, “कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी कितीतरी दगड पडले आहेत.

त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेतजमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले.
या कथेचं तात्पर्य काय?

 

मला वाटतं, या कथेतून आपण पाच गोष्टी शिकू शकतो :- 

 

१. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरेमाणकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संर्धीचे सोने करता यायला हवं. দিত নাজ

२. आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते.

३. आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते, हे लक्षात घ्या.

४. मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही कटकट म्हणून पाहिलं जातं.

५. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते; पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे.

 

                                                                                                                                                    आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात 

error: Content is protected !!