सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसांची ओळख

केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्यसंपन्न असणं नव्हे, त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणं याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही.

सकारात्मक व्यक्तिमत्त्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण होत. हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात. ‘आपण यशस्वी होणारच’ या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करतात. इतरांकडेही ती आशावादी दृष्टीने पाहतात.

सकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त असे जणू बारमाही फळच ! सर्वांनाच ते नेहमी हवेहवेसे वाटते.

 

सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे

 

हे फायदे सहज लक्षात येण्यासारखे आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात.

– उत्पादकतेमध्ये वाढ होते.
– मिळून-मिसळून काम करण्यास प्रोत्साहन मिळते.
– समस्यांचे निराकरण होते.
– गुणवत्ता वाढते.
– सलोख्याचे, खेळीमेळीचे वातावरण तयार होते.
– निष्ठा निर्माण होते.
– नफ्यात वाढ होते.

मालक, कर्मचारी आणि गिऱ्हाईक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रेरणा मिळते.

मानसिक तणाव कमी होतो.

व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते. सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो.क

व्यक्तिमत्त्व प्रसन्न होण्यास मदत होते.

 

नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम

 

जीवन ही एक मूलतः अडथळ्यांची शर्यत होय आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती स्वतःच स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी, मैत्री, नातेसंबंध, इतकंच काय वैवाहिक संबंधदेखील टिकवणंही जड जातं. नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं.

– कडवटपणा
– नाराजी
– निरुद्देश जीवन
– अनारोग्य
– स्वतःसाठी आणि इतरांसाठी मानसिक ताण

अशा व्यक्ती घरात आणि कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि समाजासाठी लोढणे बनतात. त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन केवळ आजूबाजूच्या लोकांपुरताच सीमित राहत नाही; तो भावी पिढ्यांनाही नडतो.

 

 

                                                                                                                                                    आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात 

error: Content is protected !!