संघर्ष करा, कारण यश तुमची वाट पाहत आहे…

हा फोटो एका टोमॅटोच्या झाडाचा आहे. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकले असेल. हे झाड मातीशिवाय, काळ्या पाषाणातून रुजले आणि वाढले. लहान असताना शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेससारख्या जलद गाड्या याच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश आवाज याला हादरवत असतील. अस्तित्व संपण्याची भिती होती, पण झाडाने संघर्ष करत स्वतःला जिवंत ठेवले.

ना पाणी, ना खत, ना माती, ना संगोपन—असल्या प्रतिकूल परिस्थितीतही या झाडाने फळ दिले. त्याचा उद्देश एकच होता—फळ देणे आणि संघर्षातून तो उद्देश , पूर्ण झाला.

समाजात बऱ्याच जणांना वाटते की, “आपण अपयशी ठरलो, आपले जीवन निरर्थक झाले.” परंतु त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून शिकायला हवे. परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष करत राहणे आणि ध्येय गाठणे हेच जीवनाचे खरे यश आहे.

 

बोध :

परिस्थिती प्रतिकूल असली तरी निराश होऊ नका. संघर्ष करा, कारण यश तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमची वाट पाहत असते.

                                                                                                                                                    आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात 

error: Content is protected !!