गुणसंपन्नतेची कसोटी म्हणजे आहे तरी काय?

या कसोटीवर उतरणारे लोक नेमके कोणते गुण जवळ बाळगून असतात ?

तर हे गुण म्हणजे चारित्र्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये, सकारात्मक दृष्टिकोन.

गैरसमज करून घेऊ नका. इतर सर्व कार्यक्रमही महत्त्वाचे असतातच. पण त्यांचा पाया भक्कम असेल तरच हमखास यश मिळते. हा पाया म्हणजे गुणसंपन्नतेच्या कसोटीवर उतरणारे लोक. उदाहरणार्थ, काही ग्राहकसेवा शिबिरांत ‘प्लीज’, ‘थैंक यू’ यांसारख्या शब्दांची सुहास्यवदनाने साखरपेरणी करण्यावर, हस्तांदोलन वगैरे शिष्टाचारांचा आवर्जून वापर या गोष्टींवर भर दिला जातो. पण खोटं स्मित कुठवर उपयोगी पडणार? त्या व्यक्तीच्या मनामध्ये ग्राहकाविषयी मुळातच सेवाभाव नसेल तर तो किती वेळ स्मित करणार? शिवाय असं खोटं, वरवरचं स्मित लोक लगेच ओळखतात. आपलं वर्तन खरोखरच प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं असतं. त्याचं उथळ प्रदर्शन निरुपयोगी ठरतं. याचा अर्थ असा नाही की ‘प्लीज’, ‘थैंक यू’ यासारखे सौजन्यदर्शक शब्द किंवा प्रसन्न स्मितहास्य अनावश्यक आहेत. या गोष्टी हव्यातच, पण अंतःकरणात खरा सेवाभाव असेल तर या बाह्य गोष्टी आपोआपच येतात. त्या कृत्रिमपणे कराव्या लागत नाहीत.

फ्रेंच तत्त्वज्ञ ब्लेज पास्कल याच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला, “तुमच्यासारखी बुद्धी मला मिळाली असती तर मी अधिक चांगला माणूस बनलो असतो.” त्यावर पास्कलनं म्हटलं, “तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे माझ्यासारखी बुद्धीही तुम्हाला आपोआप लाभेल.”

कॅलगरी टॉवर १९०.८ मीटर उंचीचा आहे. त्याचं वजन १०,८८४ टन आहे. या वजनापैकी ६०% म्हणजे ६,३९४ टन इतका भाग जमिनीत आहे. याचा अर्थ असा की इमारत जितकी मोठी असेल, तितकाच तिचा पाया मजबूत असावयास हवा. मजबूत इमारतीसाठी मजबूत पाया हवा असतो त्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठीही मजबूत पायाची नितांत आवश्यकता असते. हा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन किंवा मनोवृत्ती होय!

 

                                                                                                                                                    आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात 

error: Content is protected !!