संयम आणि तडजोड

संयम हा कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करतो. विपरीत परिस्थितीत आपले मन आणि विचारधारा शांत ठेवून अतिशय संयमी राहून निर्णय घेण्याची कला अवगत करणे यशस्वी भविष्यासाठी आवश्यक आहे. संयम हा प्रत्येकामध्ये जन्मजात नसतो, कधी तो शिकून, किंवा अनुभवाने वाढवावा लागतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. त्याचा खेळ नैसर्गिक आक्रमक, परंतु टेनिस एल्बो झाल्यानंतर आणि क्रिकेटची नियमावली बदलल्यानंतर त्याने आपला आक्रमक फटक्यांवर नियंत्रण आणून आपली प्रत्येक खेळी संयमाने उभारली. आपण हे कौशल्य विकसित करू शकतो. प्रत्येक जण तेंडुलकर नसतो किंबहुना तशी संधी सगळ्यांना मिळेल असेही नाही, परंतु प्रयत्न केले तर यश मिळण्याची शक्यता वाढते. सुतारपक्षीही याचे उत्तम उदाहरण आहे. तो चोच मारून मारून अतिशय संयमाने आम्हा वृक्ष कापून टाकतो. छोटीशी चिमणी देखील अतिशय परिश्रमाने हळूहळू एक-एक काडी वेचून आणन आपले घरटे बांधते. निसर्गाकडुन अशा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणूनच म्हणतात.. ‘उत्तरे सगळीकडे आहेत, प्रश्न आपल्याला शोधायला पाहिजेत.’

 

संयमाबरोबर तडजोडीवर मात करण्याची इच्छाशक्ती आपण ठेवली पाहिजे. तडजोड आणि समजदारी यामध्ये फरक आहे.

 

आपण आइस्क्रीम खायला गेलो आणि बटरस्कॉचचा मर्यादित साठा आहे तुम्हाला किंवा तुमच्या सहकाऱ्यालाच मिळेल. तुम्ही तो त्याला देवून व्हॅनिला घेतला तर याला समजूतदारपणा म्हणतात. परंतु आइस्क्रीम नाही म्हणून कॉफी चालेल का; तर ही तडजोड ठरते. कुठलेही काम करताना आपण आणि टीमने १०० टक्के द्यायलाच हवे आणि जोपर्यंत तुमचा ग्राहक १०० टक्के समाधानी होत नाही तोपर्यंत तुमचे काम संपत नाही.

 

कधीकधी आपण म्हणतो, झाले तुम्ही अगदी ९५ टक्के काम संपविले फक्त ५ टक्के उणीव आहे ते ग्राहक मान्य करेल कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही. याला तडजोड म्हणतात. पुढे जाणून तुमच्या कार्याला याची सवय लागते आणि हळूहळू कामाचा दर्जा ढासळ लागतो.

 

वेळोवेळी या गोष्टीची आणि मूल्याचे अवलोकन आपण केले पाहिजे. आपणा आपल्या किंवा सहकाऱ्याच्या कामाचा कमी दर्जा स्वीकारू लागतो तेव्हा आपली यशाची मर्यादा कमी होते. कामाचा दर्जा कधीही एकदम ढासळत नाही तर तो हळूहळू छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तडजोड करत मोठा होतो. एखादा नकाशा आखताना, जागेवरची मापे नकाशात कदाचित १००० पटीने छोटी असतात. नकाशात नुसत्या पेन्सिलच्या टोकाएवढे जरी चूक झाली तर वास्तविक जागेवरचा रस्ता किंवा चौक पूर्णपणे चुकू शकतो. एवढे तडजोडीचे महत्त्व आहे. अमेरिकेमध्ये प्रबंध लिहिला जातो तेव्हा संशोधनाइतका भाषेच्या व्याकरणावरही तेवढात भर दिला जातो. आपल्या इतिहासाची पुस्तके, वेद, व्याकरण कोणतीही तडजोड ना करतो आणि संयम बाळगून अत्यंत बारकाईने आणि सविस्तर लिहिली आहेत. त्यामुळेच प्रचंड आणि ज्ञानाचा खजाना तयार झाला आहे. संयम, समाधानता आणि सहनशक्ती असलेल्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते.

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

लेखक – डॉ. सचिन जैन

 

error: Content is protected !!