इतरांच्या आयुष्यात तुमच्या अस्तित्वाचा एक ठसा उमटवा, डाग किंवा व्रण नाही…..!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आपल्याला नव नवीन लोकं भेटतात: सामाजिक असोत, व्यावसायिक असोत किंवा वैयक्तिक…

 

या प्रवासात, अनोळखी लोकं प्रिय होऊ शकतात किंवा प्रिय लोकं शत्रू देखील होऊ शकतात. काही लोक आपल्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून येतात, तर काही धडे म्हणून देखील येतात…

 

मानवी नातेसंबंधांना “काम प्रगतीपथावर आहे” असं देखील म्हणता येईल; कारण, ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.

 

आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती – मग ती आहे किंवा होती – एक मजबूत प्रभाव पाडते; सकारात्मक असो वा नकारात्मक.

 

या सर्वांमध्ये, काही जण एक छाप सोडतात तर काही जण एक डाग सोडतात…

 

आयुष्यात आपले तीन प्रकारचे लोकं आपल्याला सोबत असतात:
काही कारणासाठी,
काही दिवसांसाठी
आणि काही आयुष्यभरासाठी…

 

आपण ही अजब असतो. आयुष्यभर आपण व्रणांना कुरवाळत बसतो, ठश्यांना नाही.

 

जी लोकं आपल्याला त्रास देतात-जखमा सोडतात, ते आपल्या आठवणींमध्ये मूळ धरतात. आपण आपल्या निराशेसाठी त्यांना जबाबदार धरतो. त्याच जखमांचं नंतर डागात-व्रणात रूपांतर होतं. दुर्दैवी घटना किंवा अनुभवांची आठवण करून देणारे डाग…

 

उलटपक्षी, आपल्याला काही सर्वोत्तम लोकं देखील भेटतात, जे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात देवदूत असतात. ते आपल्या हृदयात एक विशेष स्थान मिळवतात. ते आपल्याला खूप काही शिकवतात, ते आपल्या जीवनात एक मूल्यवर्धन असल्याचे सिद्ध करतात, ते त्यागाची मागणी करत नाहीत, ते फक्त देणारे असतात, ते आपल्या वाढीसाठी आणि उन्नतीसाठी सकारात्मक बदल घडवतात, ते आपल्याला उचलून घेतात, ते आपली काळजी घेतात.

 

एक लक्षात घ्या, आयुष्यात तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे एक उद्देश असतो. काही तुमची परीक्षा घेतील, काही तुमचा वापर करतील, काही तुम्हाला शिकवतील आणि काही तुमच्यातील सर्वोत्तम गुण बाहेर काढतील…

 

आपल्याला माहिती आहेच, काहीही कायमचे टिकत नाही. ते ही कदाचित एका विशिष्ट वेळी निघून जातील आणि कायमचे एक छाप सोडून जातील. तुमच्या हृदयात आणि आत्म्यात कायमची कोरलेली एक शाश्वत छाप. कदाचित, ते तुमच्या आयुष्यात येतात, जेणेकरून तुम्ही कसं सोडून द्यायचं, हे शिकू शकाल.

 

तुमचे मार्ग एकमेकांना मिळाले याबद्दल कृतज्ञ रहा, तुम्ही सामायिक केलेल्या आठवणींबद्दल कृतज्ञता बाळगा आणि हसत राहा. सर्वोत्तम गुण सूक्ष्म असले, तरी स्पष्ट असतात. ते तुमच्यात प्रतिबिंबित होतात.

 

चिन्ह आणि डागांच्या प्रकाराव्यतिरिक्त (सकारात्मक आणि नकारात्मक) तिसरा आणि एक अनिवार्य पैलू आहे, तो म्हणजे तटस्थ.

 

लोकांचा पाठलाग करू नका. लोक येतात आणि जातात. प्रत्येकाला तुमच्या उर्जेशी किंवा स्पंदनांशी कसं जुळवायचं हे माहित नसतं. म्हणून फक्त स्वतःसारखे रहा. स्वतःचे काम करा. तुमच्या योग्य लोक आहेत, ते येतील आणि राहतील. बाकीचे निघून जातील. त्याबद्दल शांत रहा. कोणी आयुष्यातून निघून गेलं म्हणजे नुकसान झालं असं नाही. जाऊ द्या. इतरांना प्रामाणिकपणे जाऊ देणे म्हणजे ते आपल्या प्रवासाचा किंवा भूतकाळाचा भाग असू शकतात, परंतु आपल्या नशिबाचा नाही. शेवटी तुम्ही स्वतः स्वतःसाठी आहात आणि तेच पुरेसं आहे.

 

म्हणून बोललो, इतरांच्या आयुष्यात तुमच्या अस्तित्वाचा एक ठसा उमटवा, डाग किंवा व्रण नाही.

 

एक असा ठसा, जो इतरांचं आयुष्य चांगलं बनवेल, ना की असा डाग जो इतरांना जी दुखावेल किंवा हानी पोहोचवेल.

 

तुमच्या आयुष्याच्या प्रवासात, जे सहभागी असलेल्या किंवा सहभागी झालेल्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा; एक सुंदर छाप सोडा. आयुष्य प्रवासातील रस्त्यांवर तुमचा हात धरणाऱ्या, तुमच्या सहकाऱ्यांची आठवण करा, ज्यांच्यामुळे, आज तुम्ही एक निरोगी व्यक्ती आहात…!

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

 

error: Content is protected !!