“गैरसमज” हा आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत कधी न कधी घडतच असतो…!!
म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्ण कल्पना नसताना , नुसतेच अंदाज बांधल्यामुळे आपल्याला नात्यांमध्ये अनेक “गैरसमजांना” सामोरे जावे लागते…!!
समजा आपण एखाद्याला वॉट्सअप वर मेसेज केला … आणि बराच वेळ होऊन गेला तरी रिप्लाय आला नाही … मग आपली घालमेल सुरु होते. त्या व्यक्तीचे लास्ट सीन पाहून आपण अंदाज बांधायला लागतो …
मग अचानक तिथून फोनच येतो …” सॉरी यार , काय झालंय माझ्या मोबाईलला समजतच नाही रे.. सारखा हँग होतोय !
“बग ना कॉल लागत नव्हता. मेसेज जात नव्हता…अणि आता कसाबसा लागलाय. पण आपण उद्याची भेट नक्की आहे बरं का , विसरू नकोस…… !”
आता सांग मला , काय मिळालं असले निरर्थक उलटेसुलटे विचार करून…. ?
एकदासुद्धा का वाटलं नाही मला , कि तो खरंच बिझी असेल , काहीतरी त्यालाही प्रॉब्लम असेल…?
का सतत गृहीत धरतो आपण आपल्याच माणसांना…?
परक्यांशी किती समजुतीने वागतो आपण…!
“गैरसमज” हा एक विचित्र रोग असतो जो दिसत जरी नसला तरी प्रत्येकाला थोड्या तरी प्रमाणात होतच असतो आणि आपण जे कधी बोललो पण नाही तेही लोकांना ऐकू येत असत..🙊…
त्याच साठी….
बोध
म्हणूनच सगळ्यांनी आपल्याच मनाप्रमाणे वागले पाहिजे हा अट्टाहास सोडला की सगळं सोपं होतं…!
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – डॉ अशोक माळी , मिरज
