आत्मविश्वास आणि प्रेरणा

ही एक मनोवैज्ञानिक शॉर्ट चित्रफीत आहे.

 

यात चिखलात बुडलेला घोडा संपला होता. स्वतःहुन त्या डबक्यातून बाहेर पडायला हताश झाला होता,हार मानला होता.

 

परंतु कळपाचे/ समूहाचे समर्थन व प्रेरणा घेऊन त्याच्या अंतःकरणातील सामर्थ्य,धैर्य व आत्मविश्वास जागा झाला.

 

स्वत: ला या दुर्दैवी व धोक्यातून मुक्त करून घेण्याची ऊर्जा त्याला आप्त-समूहाकडून मिळाली.आणि तो स्वतः त्या दलदलीतून बाहेर पडून नव्या आयुष्याची सुरुवात करतो.

 

माणसांचेही असेच आहे.जेंव्हा तो समूहात राहतो,किंवा समूहातील एक जण प्रचंड कष्टाने प्रांजळपणे एखाद्याला दलदलीतून बाहेर काढण्याची सामूहिक सकारात्मक प्रेरणा निर्माण करतो तेंव्हा माणूसही फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्याने आयुष्य सुरुवात करतो.अर्थात चांगला समूह,चांगला मित्र माणसांना जगण्याची ऊर्जा देत असतो.

 

म्हणून सकारात्मक व्हा. आपल्या आत्मविश्वासास प्रोत्साहित करा जेव्हा संधी मिळेल तेंव्हा इतरांना मदत करा. प्रोत्साहन हे तुमचे शब्द किंवा कृतीद्वारे असू शकते जे इतरांचे जीवन बदलू शकेल.

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

 

लेखक – अज्ञात

 

 

error: Content is protected !!