शरीर ओके तर ठिकाणावर डोके,
एक लक्षात असु द्या…
आपल्या वडिलांचे
नांव व संपत्ती,
आपल्याला मिळू शकते,
पण आरोग्य,शरीर,
आपले आपल्यालाच कमवावे लागते,
ते वारसाहक्काने मिळत नाही.
आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता,
पण…
इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम,
तोचं खरा श्रीमंत…
असचं म्हटलं जाईल…
प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप आहे,
पण खाता येत नाहीये,
हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,
म्हणून शरीर,आरोग्य हे जपा..!!
पण त्याचबरोबर..
चांगली माणसं ही जपा…
कारण…
जसे उत्तम शरीराशिवाय,
आनंद नाही,
तसेच चांगले
जिवलग मित्र-मैत्रीण शिवाय,
जीवन नाही…
जगताना स्वतःच्या बोलण्यात,
इतका सरळपणा…
व तिखटपणा ठेवा…
की,वाईट लोकांना त्याचा ठसका,
आणि चांगल्या लोकांना त्याची,
चवच लागली पाहिजे…!!
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
