एका नदी किनारी दोन मडकी राहत होती…
एक लोखंडाच आणि एक मातीच दोघांची खूप मैत्री होती…
एके दिवशी नदीला पुर आला. दोन्ही मडकी वाहत जाऊ लागली…
लोखंडाच मडक मोठ, मजबूत आणि कणखर होत. ते मातीच्या मडक्याला म्हणाल…
तू माझ्या जवळच राहा, मी तुला वाचवेन…
मातीचे मडके म्हणाले नाही मित्रा, मी तुझ्या जवळ राहिले तर नक्की फुटेन. कारण तुझा कणखरपणा माझ्यासाठी धोकादायक ठरेल. माझी ताकद म्हणजे माझ हलक असण. मी लाटेबरोबर वाहत जाईन, टक्कर देणार नाही. अस केल तरच मी वाचेन…
आणि खरंच, पुर उसरल्यावर लोखंडाचे मडके जड असल्याने दगडांवर आदळून वाकडे झाले, पण मातीचे मडके लाटांबरोबर वाहून गेले आणि सुरक्षित वाचले…
तात्पर्य :
- कधी कधी कणखर राहण नाही तर लवचीक राहण हेच खरं सामर्थ्य असत…
- आयुष्यात परिस्थितीला टक्कर देऊन तुटण्यापेक्षा, वेळेनुसार वळण घेण, जुळवून घेण हे जास्त शहाणपणाच असत…
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
