कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं… हे कळलं तर आयुष्य ‘भावगीत’ आहे….
किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं…. हे उमजलं तर आयुष्य ‘निसर्ग’ आहे…
किती आठवायचं आणि काय विसरायचं… हे जाणलं तर आयुष्य ‘इंद्रधनू’ आहे…
किती रुसायचं आणि केव्हा हसायचं…. हे ओळखलं तर आयुष्य ‘तारांगण’ आहे…
कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं…. हे जाणवलं तर आयुष्य ‘ नंदनवन’ आहे….
कुठे ? कधी ? किती ? काय ? केव्हा ? कसं ? याचा समतोल साधता आला तर…
आयुष्य खूप सुंदर आहे!
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
