“सकारात्मक दृष्टीकोनातून जगण्याचं रहस्य”

काही व्यक्ती नेहमी आनंदी दिसतात, कारण त्यांनी आनंदी राहण्याची निवड केलेली असते.

 

काही व्यक्ती नेहमी आनंदी का दिसतात, याचं खरं कारण त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी नव्हे, तर त्या गोष्टींवर त्यांनी घेतलेली मानसिक प्रतिक्रिया असते.

 

अशा व्यक्ती आनंद हा बाह्य परिस्थितींवर अवलंबून न ठेवता, आतून निर्माण करतात.

 

त्यांनी आनंदी राहण्याची निवड केलेली असते, म्हणजेच, ते दुःख, तणाव किंवा अडचणी नाकारत नाहीत, पण त्यांच्याशी जाणीवपूर्वक सकारात्मक दृष्टिकोनातून सामना करतात.

 

मानसशास्त्रात याला “संज्ञात्मक पुर्नर्रचना” (Cognitive Reframing) असे म्हणतात.

 

यामध्ये माणूस प्रत्येक परिस्थितीकडे नव्या नजरेने पाहायला शिकतो.

काही व्यक्ती दररोज कृतज्ञता व्यक्त करतात, स्वतःच्या भावना ओळखतात आणि त्यावर काम करतात.

 

यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य सुधारतं आणि ते अधिक समाधानकारक आयुष्य जगू शकतात.

 

आनंद हा संयोग नसून, एक मानसिक निवड आहे. हे त्यांनी आत्मसात केलं असतं. म्हणूनच ते सतत सकारात्मक आणि प्रेरणादायी वाटतात.

 

 

 

 

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

 

 

लेखक – राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ज्ञ)

 

 

 

 

error: Content is protected !!