नाती : जोडण्यापेक्षा जगवणं महत्वाचे

​नात्यांची गुंफण करणं आजच्या जगात खूप सोपं झालं आहे. एक भेट, एक हास्य किंवा काही चांगले बोल. आणि नातं तयार! पण खरी कसोटी तेव्हा लागते, जेव्हा त्या नात्याला जगवण्याची आणि जतन करण्याची वेळ येते.

 

फक्त शब्दांवर, वचनांवर किंवा भेटींवर कोणतंच नातं टिकत नाही. ते टिकतं मनाच्या ओलाव्यावर आणि आपल्या माणसांसाठी हृदयात राखून ठेवलेल्या जागेवर. आज नाती जितक्या वेगाने जुळतात, तितक्याच वेगाने तुटतात. याचं मुख्य कारण म्हणजे, त्या नात्यांमध्ये ‘मनापासून’ कुणी राहत नाही. लोकांना फक्त नात्याची सुरुवात हवी असते, पण गैरसमज आणि कडू प्रसंग सहन करण्याचा धीर कुणाकडे नसतो.

 

 

 

​*नात्यात जीव ओतणे म्हणजे काय?*

 

 

एखाद्याच्या रागातही त्याचा हात न सोडणे. त्याच्या शांततेतही त्याच्या भावनांचा आवाज ऐकणे. तो तुटत असताना त्याला जोडण्यासाठी स्वतः तुटायला तयार होणे.

 

​जी माणसं नात्यात जीव ओततात, ती आयुष्यभर लक्षात राहतात. कारण त्यांनी नातं सोबत घालवलेल्या दिवसांवर नाही, तर सोबत अनुभवलेल्या भावनांवर उभं केलेलं असतं. हे नातं कृत्रिम नसतं; ते दुखावलं तरी समजून घेणारं आणि दूर गेलं तरी पुन्हा जवळ आणणारं असतं.

 

​नुसतं नातं जोडणं सोपं आहे, पण त्यात आपलं मन उघडून दाखवणं आणि चुकांवर मात करून नातं जगवणं कठीण आहे. म्हणूनच खरी नाती आजही दुर्मिळ आहेत. त्यांना वेळ नाही, तर ‘जीव’ ओतावा लागतो.

 

 

 

 

बोध

 

केवळ जोडलेली नाती विसरली जाऊ शकतात, पण जीव ओतून जपलेली नाती आयुष्यभर हृदयात घर करून राहतात.

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!