Believe – विश्वास आणि Trust – विश्वास

दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासामध्ये काही अंतर आहे.

 

एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींमध्ये केबल टाकून ती घट्ट बांधून आणि हातात मोठा बांबू घेतलेला एक डोंबारी त्या केबलवरून एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता.

 

दोन इमारतींच्या मध्ये हजारो माणस जमलेली होती, आणि श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती. हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केल.

 

जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या वाजवल्या, शिट्या वाजवल्या आणि तोंडभरून कौतुक केल. तो डोंबारी इमारतीच्या खाली लोकांमध्ये आला. लोक त्याच्याबरोबर फोटो आणि सेल्फी काढू लागले. त्याच अभिनंदन करू लागले.

 

तो डोंबारी सगळ्यांना उद्देशून म्हणाला,
“मला हे पुन्हा एकदा करावस वाटत. तुम्हाला विश्वास वाटतो का की मी हे पुन्हा करू शकेन?”

 

सगळी माणसं एक आवाजात म्हणाली,
“हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस.”

 

 

डोंबारी म्हणाला,
“तुम्हाला विश्वास आहे ना, की मी हे परत करू शकेन?”

 

पुन्हा सगळे ओरडले,
“हो हो, आम्हाला विश्वास आहे, तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील.”

 

डोंबारी म्हणाला,
“तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?”

सगळ्यांनी उत्तर दिल,
“हो, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू खात्रीने हे करू शकशील.”

 

डोंबारी म्हणाला,
“ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या, मी त्याला खांद्यावर घेऊन त्या केबलवरून चालतो.”

 

जमावात एकदम शांतता पसरली. सगळे चिडिचूप झाले. डोंबारी म्हणाला,
“काय झाल? घाबरलात का?”

 

“अरे, आताच तर तुम्ही म्हणालात की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ना?”

 

तात्पर्य :-

 

जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास तो Belief होता.
Trust नव्हता.

 

तसेच हाच भ्रम अनेक लोकांना आहे, की परमेश्वर आहे, पण त्याच्या शक्तीवर विश्वास नाही.
You only believe in God, but you don’t trust Him.

 

परमेश्वरावर विश्वास असेल, तर चिंता आणि ताण-तणाव कशाला हवेत?
त्याच्या नामाने दगड तरले तरी आपण का नाही तरणार?

 

परमेश्वरावर ठाम विश्वास असावा, आणि यासाठी आपण चमत्काराची वाट पाहण्याऐवजी, रोजच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींमध्ये त्याचा अनुभव घ्यावा.

 

आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला परमेश्वर आपल्या सोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच. जर हा विश्वास असला, तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!