हितगुज…

♠ हितगुज… ♠

 

 

होय, मुद्दामच मनोगत शब्द टाळून हितगुज शब्द वापरतोय, कारण माझे प्रियजन, आप्त आणि मित्रगण आमच्यात परस्परांच्या हिताच्या गुजगोष्टी या नेहमी होतच असतात. परंतु क्वचित कधी त्यांनाही आपल्या मनातल्या खास सुविचारांच्या रुपाने व्यक्त व्हावसं वाटतं. जे विचार, सुविचार आपल्या संवादातून आपण प्रत्येक वेळी बोलत असतोच असे नाही, त्यात उपदेशाचा भाव असतोच असे नाही, जो या विचारधन इस्तिकेतील वेचक आणि वधेक अशा विचार, सुविचार संगहाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दोहोचविण्यासाठी हा शब्दप्रपचं, उपदेश नव्हे तर हितगुज.

बांधवानो, जेव्हा देवांनी सागर मंथन केले त्यातून अनमोल रत्ने बाहेर पडली होती. मानवास ईश्वराने नुसते घडवले नाही, तर त्याने त्यास अपार बुध्दिमत्ता व विचारशक्ती सुध्दा बहाल केली आहे. आपल्या अनुभवांना योग्य शब्द, उचित विचारांच्या मालिकेत गुंफण्याचे काम तो सहजपणे करतो. असे विचार, अशा सुविचारांचे मोती माणसाने केलेल्या विचारमंथनातून बाहेर पडत असतात. लहानापासून थोरामोठ्यापर्यंत, प्रत्येक व्यक्ती या मौलिक विचारांचा वापर आपल्याला हवा तेव्हा व हव्या त्या प्रसंगी करू शकते, करायला हवा. जगातील, देश, विदेशातील थोर विचारवंत लेखक, उद्योजक, शास्त्रज्ञांनी मांडलेले हे विचार आहेत. त्यांचे मनन, चिंतन करावे व ते आचरणात आणण्याचे प्रयत्न केले तर मानवी संस्कृतीचे चित्रंच बदलून जाईल. कारण विचारांचे सामर्थ्य फार मोठे आहे. विचारांनीच तर माणूस घडतो, त्यात सकारात्मक व प्रभावी विचारांनी मनुष्य अधिक लवकर आपले यशोशिखर गाठू शकतो. विचारधन या विचार संग्रह मुस्तिकेत ज्ञान, कार्य, निसर्ग, समाज, राजकारण, कला, क्रीडा, परंपरा आणि संस्कृती यांसारख्या मनुष्य वर्तन, आचार, विचार संस्करण आणि आयुष्याशी जवळून संबंध असणाऱ्या वेचक, वधेक व प्रभावी ठळक विचार, सुविचारांचे संकलन या विचारधन पुस्तिकेत केले आहे. जसा वेळ मिळेल तसा व केव्हाही कुठेही असाल तिथे हे विचारधन आपण सोबत ठेवून त्याचे अवश्य वाचन व मनन करावे. जे तुम्हाला सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या दैनंदिन जीवनात वेळप्रसंगी ओढवणाऱ्या नैराश्य, ताण तणावातून मुक्त करून सफल व सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी निश्चितच लाभदायी, आनंददायी ठरले हा विश्वास, हा प्रयास.

 

कडूभाऊ काळे
अध्यक्ष,नागेबाबा उद्योग समूह

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!