ना वेगळ्या जातींची, कुत्र्यांची पिल्ले विकून चरितार्थ चालवायचा. तशी त्यांची परिस्थिती सर्वसाधारण होती. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नव्हते. कुत्र्याची एकदोन पिल्ले विकली गेली की कसाबसा घरखर्च निघायचा. नाना सुशिक्षित होता. पण कुठेही त्याला नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे मित्राच्या मार्गदर्शनाने त्याने हा व्यवसाय चालू केला होता. अचानक एक दिवस शेजारील गावातील गुंड गुलाब, ज्याची आजूबाजूच्या भागात प्रचंड दहशत होती. अनेक जणांना यापूर्वी त्याने दमदाटी व मारहाण करून त्या भागात वट बसवला होता. त्याच्या साथीदारांसह नानाच्या घरासमोरील मोकळ्या जागेत दोन सुंदर कुत्र्यांची पिल्ले विक्रीला असल्याचे बघून थांबला. व जीपमधून आपल्या गैंगसह खाली उतरून नानाला पैसे न देताच दोन्ही कुत्र्यांची पिल्ले ओढत घेऊन जाऊ लागला. नानाने पैसे मागताच गुलाबने त्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केली. गुलाबच्या गुंडांनीदेखील नानाला धक्काबुक्की केली. नानाच्या डोळ्यात पाणी आले. नाना असहाय होता.
जीपमधून पिल्ले नेताना गुलाब गाडी चालवता-चालवता एका पिल्लाला कुरवाळताना त्या पिल्लाने गुलाबच्या हाताचा चावा घेतला. गुलाब दवाखान्यात गेला व इंजेक्शन घेऊन जखमेवर मलमपट्टी केली.
पण मलमपट्टी केल्यानंतर हळूहळू हातात वेदना सुरू झाल्या. जखम ठणकू लागली तीन दिवसांनंतर जखम पांगली. अर्थात गँगरीन सारखाच प्रकार झाला. डॉक्टरने जखमयुक्त एक बोट कट करावयास सांगितले. एक बोट कट करून परत मलमपट्टी केली. दहा दिवसांत ती जखम मुठीच्या मागील भागापर्यंत पसरली, इन्फेक्शन फार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेवटी गुलाबचा हात कापावा लागला गुलाबची बायको आध्यात्मिक होती तिने गुलाबला विचारले, “गुलाब या हाताने तू काय वाईट काम केलं ते सांग? त्याशिवाय असं होणार नाही.” शेवटी गुलाबने नानाला फटके टाकून त्याची दोन कुत्रे फुकट आणल्याचे बायकोला सांगितले.
बायको म्हणाली, “गुलाब चल, त्या माणसाची कान पकडून माफी माग. हा दुःख कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. असे आमच्या गुरूने आम्हाला शिकवले आहे” गुलाब बायकोबरोबर नानाकडे आला व त्याला म्हटला की, “नाना, तुला काय सिद्धी बिद्धी आहे का? तू मला शाप दिला का? असं तू माझ्या बाबतीत असे काय केलंस? ज्यामुळे माझा हात तोडावा लागला?” हे वाक्य ऐकताच नाना एवढंच म्हणाला, “गुलाब, तू मला धक्काबुक्की करून माझी दोन कुत्री फुकट नेलीस. या कमाईवरच माझा उदरनिर्वाह चालतो. त्यावेळी मी फक्त आकाशाकडे पहात त्या अद्भुत शक्तीला हात जोडून एवढच म्हटलं, देवा आज याने त्याची ताकद मला दाखवून माझ्यावर अन्याय केला. आता मात्र तू तुझी ताकद याला दाखव.”
मित्रांनो, ज्या हाताने अनेकांना फटके टाकून, नानाला धक्काबुक्की करून त्याची कुत्री फुकट ओढून नेली त्याच हाताला देवाने तोडले होते. कर्म फल सिद्धांत अटळ असतो. ताकदीच्या जोरावर इतरांवर अन्याय करू नका कुणाच्याही हक्काचं ओरबाडून खाऊ नका. नाहीतर तुमचापण गुलाब व्हायला वेळ लागणार नाही हे पक्क लक्षात ठेवा. ताकदीच्या, सत्तेच्या, पैशाच्या, जोरावर माज करू नका. लक्षात ठेवा, सारं जग निसर्ग नियमानुसार चालतं. निसर्गाचा नियम ठरलेला आहे. तुमच्या प्रत्येक कृत्याची एन्ट्री तुमच्या अकाउंटला पडत असते. म्हणून चुकीचं काम करू नका.
न्यूटनचा तिसरा नियम लक्षात ठेवा, क्रिया आणि प्रतिक्रिया बलं यांची परिमाणे समान असतात. परंतु त्यांच्या दिशा परस्परविरोधी असतात. निसर्गात क्रियेला प्रतिक्रिया अनेक पटींनी असते. त्यामुळे वाईट कर्म करताना दहा वेळा विचार करा.. भगवान बुद्ध म्हणतात, “तुम्ही उगीचच कोणावर एखादा बांबू उगारला तर तुमच्या मागे दुसरा कोणीतरी लाकडी वासा घेऊन उभा आहे. फक्त वेळेचा अवकाश आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही जे पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम आहे.”
चालू गिरी बंद करा व सत्याने वागा.
म्हणतात ना,
कोई लाख करे चतुराई,
करम का लेख मिटे ना रे भाई.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
