हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

♠ हे म्हातारे थकत कसे नाहीत.? ♠

 

सकाळी पाच वाजता उठतात.
सगळं आवरुन फिरायला जातात.
व्यायाम करुन हसत परत येतात.
हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

नातवंडाशी खेळून मस्ती करतात.
घरभर पळून उच्छाद मांडतात.
पोथ्या पुराणे देव पुजेत रमतात.
हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

पेपर वाचतात, बातम्या पाहतात.
राजकारणावर हिरीरीने बोलतात.
नाटक सिनेमा आवडीने पाहतात.
हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

दुध भाजी किराणा आणतात.
नातवंडाना शाळेत सोडतात.
संध्याकाळी त्यांना खेळायला नेतात.
हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

पडतात धडपडतात, परत उठतात.
एव्हढसं खातात, खूप औषधं घेतात.
निशाचरागत जागत बसतात.
हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

लग्न समारंभात सतत मिरवतात.
लहान थोरांची खुशाली विचारतात.
ताजेतवाने होऊन घरी परततात.
हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

ते कधीच थकणार नाहीत.
कारण ते म्हातारे नाहीत
तर ते महा-तारे आहेत.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

-एक लेखक

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

 

error: Content is protected !!