एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली. एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले. राजाला आश्चर्य वाटले. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड शिल्लक आहे का ? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेव्हा राजा म्हणाला “अशी भेट वारंवार मिळत नाही.” आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे जीवन परत मिळणार नाही.
संकलन-सदानंद पाटील, रत्नागिरी.
