
नागेबाबा परिवाराच्यावतीने अहिल्यानगर शहरातील हॉस्पिटलमध्ये येणारे खेडेगावातील पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत मोफत प्रेमाचा डबा दिला जातो, हे अतिशय योग्य ठिकाणी व गरजेच्या वेळी अन्नदान आहे. दुसरे म्हणजे हनुमान टाकळी येथे नागेबाबा गोशाळेमध्ये कत्तलखान्यातून सोडलेल्या गोमाता व त्यांचे वंश यांच्या चाऱ्यासाठी खर्च करून त्यांचे संगोपन केले जाते, हेही अतिशय महत्त्वाचे काम आहे आणि हे दोन्हीही काम पुण्याचेच काम आहेत, सत्कर्माचे काम आहेत. हे काम नागेबाबा परिवार करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सकारात्मक विचाराची व आर्थिक सहकार्याची गरज आहे!
युवा हृदयसम्राट समाधान जी महाराज शर्मा यांच्या शुभ हस्ते या सत्कार्माला मदत व्हावी म्हणून क्यू आर कोड चे अनावरण करण्यात आले. सदर क्यू आर सर्व व्यापारी बंधूंच्या विनंतीनुसार त्यांच्या दुकानात लावण्यात येईल. यावेळी महाराजांनी सर्वांना मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी नागेबाबा परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
- समाधान महाराज शर्मा
आपला परिवार नागेबाबा परिवार
