वार्धक्य आणि तारुण्य

 

जेव्हा तरुण होतो तेव्हा मला झोपेतून उठायचा कंटाळा यायचा, आता म्हातारपण आल्यावर झोप लागणं कठीण झालंय.
———————————————————-
जीवनातली वास्तविकता आणि जीवनाचं सत्य बघा किती सुंदर रित्या सांगितलंय. 👌👍😃 .

तारुण्य आणि वृद्धावस्था

तरुण होतो तेव्हा मी माझ्या चेहऱ्यावरच्या मुरुमांची चिंता करायचो. आता वय झालय तर मी माझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता करू लागलोय.

तरुण होतो तेव्हा कुणाचा तरी हात हाती घ्यावा यासाठी तिष्ठत होतो. आता वय झाल्यावर कुणीतरी आपला हात हाती घेईल याची वाट बघत तिष्ठत बसावं लागतं.

लहान होतो तेव्हा माझ्या आई बाबांनी मला एकटं सोडावं असं वाटायचं. आता वय झाल्यानंतर मला एकटं राहायची भीती वाटायला लागलीय.

तरुण असताना, सल्ला देणाऱ्यांची मला चीड यायची. आता माझ्या या उतारवयात माझ्याशी बोलायला किंवा मला सल्ला देणारा कुणी उरला नाहीये.

जेव्हा मी तरुण होतो तेव्हा सुंदर गोष्टींची मी तारीफ करीत असे. आता वय झाल्यावर मी प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करतो.

तरुण असताना मी अमर आहे असं मला वाटायचं. वय झाल्यावर आता लवकरच माझाही नंबर लागणार ही जाणीव मला उदास करून जातेय.

तरुण असताना मी प्रत्येक क्षण उपभोगला. आता वय झाल्यावर मी त्या क्षणांच्या शिदोरीवर जगतोय.

आयुष्यातील बिकटच्या प्रसंगी आपल्याला चिंता वाटते पण आपल्याला ती जाणवत नसते. जीवन अनुभवायचं असतं.

आपण तरुण आहात की म्हातारे हे महत्वाचं नसतं. महत्वाचं हे की जीवन जगावं लागतं आणि ते प्रेमानं व आपल्या प्रियजनांसोबत जगायचं असतं. वाचक हो तुम्हीही माझ्यासाठी माझ्या प्रिय जणांपैकी एक आहात. बरं कां!

सगळ्यांसोबत सामायिक करावा असा सुंदर संदेश.

 

                                                                                                                                                            आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक–अज्ञात 

error: Content is protected !!