अलेक्झांडर द ग्रेटच्या शेवटच्या 3 ईच्छा

एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, अलेक्झांडर द ग्रेटने, मृत्युशय्येवर असताना, आपल्या सेनापतींना एकत्र केले आणि आपल्या तीन अंतिम इच्छा त्यांना सांगितल्या. त्या अशा होत्याः

 

1) जगातील सर्वोत्तम डॉक्टरांनीच त्याची शवपेटी उचलावी.

 

2) त्याने आयुष्यभर जमा केलेली अफाट आर्थिक संपत्ती (सोने, मौल्यवान हिरे-माणकं, दागिने) त्याच्या अंत्ययात्रेमध्ये उधळावी.

 

3) जे लोक त्याच्या अंत्ययात्रेत सामील होतील त्यांना दिसेल अशा पद्धतीने त्याचे हात शवपेटीच्या बाहेर लोंबकळत ठेवावेत.

 

त्याच्या सरसेनापतीने त्याच्या या इच्छांमागचे कारण त्याला विचारले. त्या आदरणीय राजाने खालील उत्तर दिलेः

 

सर्वप्रथम, जगातल्या सर्वोत्तम डॉक्टरांनी त्याची शवपेटी उचलावी. म्हणजे लोकांच्या हे लक्षात येईल की जगातील सर्वोत्तम औषधोपचार उपलब्ध असूनही माणूस मृत्यू चुकवू शकत नाही.

 

दुसरे, त्याची संपत्ती रस्त्यावर उधळून दिली की उपस्थित लोकांना हे कळेल की पृथ्वीवर जमा केलेली संपत्ती मेल्यानंतरही पृथ्वीवरच राहते. शेवटी, त्याने त्याचे हात शवपेटीच्या बाहेर लोंबकळत ठेवण्यास सांगितले म्हणजे त्याचे जे अनुयायी आहेत त्यांच्या लक्षात येईल की आपण जन्मताना रिकाम्या हातांनी येतो आणि रिकाम्या हातांनीच मरण पावतो.

 

आपण अलेक्झांडर द ग्रेट च्या या तीन इच्छा आपल्या आठवणीत खोलवर ठेवून देऊ या. त्यांचा अवलंब त्वरेने आपल्या आयुष्यात करू या. त्यामुळे पैशांमुळे विकत न घेता येणाऱ्या संपत्तीचा अनुभव आपण लगेच घेऊ शकू.

 

                                                                                                     आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!