असामान्य कर्तृत्वाचं सूत्र वापरा

 

तुम्ही जर माझ्यासमोर बसलात आणि मला विचारलंत की हे मोठमोठे सीईओ, कोट्यधीश, उद्योजक, व्यावसायिक खेळाडू आणि नेते घडतात कसे हे सारांशरूपानं सोप्या भाषेत सांगा, तर मी तुम्हाला हे सूत्र सांगेनः

 

(गुरु X सराव X गुरु X सहकारी) / (चिकाटी + दीर्घकाळ)   =   श्रेष्ठत्व

 

होय, हेच मी तुमच्यासाठी कागदाच्या चिठोऱ्यावर लिहीन.

 

“प्रगती” म्हणजे तुमच्या क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांपेक्षा तुमची कामगिरी वरचढ व्हायला हवी. त्यासाठी तुम्ही जास्तीतजास्त अभ्यास करायला हवा आणि तुमची कौशल्ये विकसित करायला हवीत. त्यामुळेच तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या क्षेत्रातले सर्वोत्कृष्ट लोक कशा प्रकारे काम करतात.

 

“सराव” म्हणजे अर्थातच तुम्ही जास्तीतजास्त वेळा तुमचं काम करून बघायला हवं. ते अजून चांगल्या प्रकारे कसं करता येईल यांचे नवनवे मार्ग शोधायला हवेत. म्हणजे तुम्हाला तुमच्यातल्या नैसर्गिक गुणांचा परिणामकारक वापर करता येईल.

 

“गुरू” म्हणजे उत्कृष्ट मार्गदर्शक शोधणे. तुमच्या कामासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यात निश्चितपणे प्रगती करण्यासाठी तुम्हाला मदत करणारा मार्गदर्शक हवा. तुम्ही चुकीच्या दिशेने भरकटू नये आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातली वर्षे वाया आऊ नयेत याची काळजी घेणारा मार्गदर्शक हवा,

 

“आणि ‘सहकारी” म्हणजे तुमच्याबरोबर काम करणारे इतर लोक, जे लोक आपल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी स्वतःला झोकून देतात त्यांच्या सान्निध्यात शक्य तेवढा जास्त वेळ घालवा, त्यांच्यातली ऊर्जा, त्यांचं कामातलं प्रावीण्य, त्यांची धमक, काम करताना ते पाळत असलेले नीतिनियम यातून तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळेल.

 

या समीकरणातला जो छेद आहे त्यात दोन महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्यावर तुम्ही विचार करावा असं मला वाटतंय. “चिकाटी” म्हणजे असा गुण जो अपयशाला ऊर्जेमध्ये बदलवून टाकतो, ढासळत्या दगडांचं प्रगतीच्या पायरीत रूपांतर करतो. काही जण खूप पटकन हार मानतात. त्यामुळे त्यांना इतरांकडून फारशी मदत मिळत नाही. भाग्य हे नेहमी हार न मानणाऱ्यांच्या बाजूनं असतं. लक्षात ठेवा.

 

आणि “दीर्घकाळ” ही खूप साधी पण महत्त्वाची गोष्ट आहे. असामान्य यश मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रात बऱ्याच काळासाठी टिकून राहायला हवं. जगाच्या दृष्टीनं जेवढा काळ वाजवी आहे, योग्य आहे, तर्कसंगत आहे त्यापेक्षा जास्त काळ तुम्ही तिथे पाय रोवून उभं राहायला हवं. जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या इतर लोकांपेक्षा जास्त काळ तिथे असायला हवं. तुमच्या क्षेत्रात अलौकिक कामगिरी करण्यासाठी तुम्ही आयुष्यातला जास्तीतजास्त काळ तुमच्या क्षेत्रासाठी द्यायला हवा.

 

आता या संदेशाच्या निमित्तानं शेवटची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. अनपेक्षितपणे कधीतरी तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकू येतो. तुम्ही काय साध्य केलं म्हणजे तुमचं समाधान होईल हे तो तुम्हाला शोधायला भाग पाडतो. ते साध्य करणं ही तुमची सर्वोत्तम कामगिरी असते. या आवाजावर विश्वास ठेवा. तुम्ही एकाग्रतेनं, धैर्यानं आणि काळजीपूर्वक तुमची सर्वोत्तम कामगिरी शोधून काढलीत तर तुमचं जगही समाधानी असेल.

 

                        आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!