कष्टाला पर्याय नाही

जे मोठे काम तुम्ही सगळ्यांत जास्त टाळू पाहता त्या कामाची सुरुवात करणं खरंतर तुमच्यासाठी खूप गरजेचं असतं.

 

आपल्याला नेहमी असं वाटतं की ज्या कामाची आपल्याला भीती वाटते ते आपण शक्यतो टाळायचं असतं. नाही तर याउलट ते हाती घ्यायचं असतं. कारण भीतीला आपण सामोरे गेलो नाही तर ती कायमची आपल्या मनात राहते आणि आपल्या कर्तृत्वाला मर्यादा घालते. ज्या संधीपासून आपण लांब पळतो ती आपल्या हातून निसटताना आपल्यातल्या असामान्य क्षमताही हिसकावून घेऊन जाते.

 

हेही लक्षात ठेवा, जेवढे जास्त कष्ट आपण घेऊ तेवढं जास्त समाधान आपल्याला मिळतं. किती मोठा विरोधाभास, नाही का? यामागचं कारण असं आहे की, आपण जर सातत्यानं अवघड गोष्टी करीत राहिलो तर हळूहळू आपल्यातल्या बुद्धीची चमक, आपला कणखरपण, आपला चांगुलपणा यांची आपल्याला जाणीव व्हायला लागते. ज्या गोष्टी इतके दिवस आपल्यात सुप्त स्वरूपात होत्या त्यांच्याशी आपली ओळख होते. अशी स्वतःशी ओळख झाल्याचा आनंद कायम टिकणारा असतो. आपण अवघड काम हाती घेतो तेव्हा समाधान, त्या कामातली अर्थपूर्णता, त्या कामामागची प्रेरणा सातत्यानं आपल्याला मिळत राहतात. म्हणून मी सांगतो की तुमचं काम निग्रहानं (आणि निकरानं) करणं ही एक प्रकारची संपत्ती आहे. तो संपत्तीचा प्रचंड मोठा स्रोत आहे.

 

काही लोकांचं मत कष्ट करण्याबद्दल फारसं अनुकूल नाही. मला मान्य आहे की आपण विश्रांती घ्यायला हवी. परिश्रमानं आलेला शीण जायला हवा. परिश्रमामुळे मिळालेल्या लाभाचा आनंदही लुटायला हवा. तुम्ही एखादं काम खूप मनापासून करायचं ठरवता तेव्हा ते करण्यासाठी तुम्हाला मोठी ऊर्जा मिळते, आत्मविश्वास मिळतो, उत्साह येतो आणि शांती मिळते. परिश्रम घेण्याची सवय असण्याचे फायदे नक्कीच आहेत. आयुष्यात काहीही न करता ज्यांना संपत्तीत व्हायचं असतं त्या लोकांपेक्षा तुम्ही कितीतरी पुढे निघून गेलेला असता. तुमचं आयुष्यच विशेष, वेगळं बनतं.

 

 

                        आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!