आणि ती जिंकली

बुलढाणा भागात मेहकर तालुक्यात लता भगवान करे नावाची ६५ वर्षाची महिला. ३ मुलीचं लग्न करून दिलं. सर्व काही व्यवस्थित बाललेले असताना अचानक पतीराज आजारी पडले. तालुक्याच्या डॉक्टरने काही चाचण्या करण्यासाठी बारामतीच्या रूग्णालयात नवऱ्याला घेऊन जाण्यास सांगितले. बरीचशी सूट देऊन देखील थोडेफार पैसे उपचारासाठी लागणार होते. तेवढे पैसे देखील त्या माऊलीकडे नव्हते. म्हणून रुग्णालयाबाहेर असलेल्या बाकड्यावर ती चिंताग्रस्त अवस्थेत बसली होती. शोकमग्न असताना बाकड्यावर असलेल्या पेपरच्या एका जाहिरातीवर तिची नजर खिळली.
“शरद मॅरेथॉन स्पर्धा” जिंकल्यानंतर बक्षिस म्हणून रोख रक्कम मिळणार होती. त्या माऊलीने संयोजकाशी संपर्क साधला व या स्पर्धेत ती उरतली.
स्पर्धा सुरू झाली, रोज सराव करणाऱ्या, स्पोर्टस शुज घालणाऱ्या भल्याभल्यांना या नऊवारी लुगडं घातलेल्या माऊलीनं बघता बघता मागे टाकलं, अनवाणीच ती पळत होती. तिच्या डोळ्यासमोर फक्त तिचा नवरा व त्याच्या उपचारासाठी लागणारी रोख रक्कम दिसत होती. वाऱ्याच्य वेगानं ती धावली आणि जिंकली. तिच्यात असलेल्या सुप्त शक्तीची जाणीव तिला या संकटसमयी निसर्गानं करून दिली. म्हणून प्रत्येकात काहीतरी सुप्तगुण असतो. त्याचा ठाव घ्या.

“मंजिले उन्ही को मिलती है। जिनके सपनों में जान होती है।
पंख होने से कुछ नही होता । हौसलो से उड्डाने होती है ।”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!